EXCLUSIVE : जेव्हा शाहरुखलाच नाकारलं गेलं आणि कतरिनाला कोरिओग्राफरनं म्हटलं होतं झीरो

EXCLUSIVE : जेव्हा शाहरुखलाच नाकारलं गेलं आणि कतरिनाला कोरिओग्राफरनं म्हटलं होतं झीरो

शाहरुख खानचा स्ट्रगल तर सगळ्यांनाच माहीत आहे. दिल्लीहून अभिनय करायला तो मुंबईत आला होता. तेव्हा काम मिळण्यासाठी तो दारोदारी भटकत होता.

  • Share this:

सुशांत मोहन, प्रतिनिधी

मुंबई, 19 डिसेंबर : काऊंट डाऊन सुरू झालं. झीरो सिनेमा रिलीजसाठी सज्ज झालाय.येत्या शुक्रवारी झीरो रिलीज होतोय. एक बुटका माणूस, दिव्यांग मुलगी आणि एक स्टार यांची ही गोष्ट आहे. त्यानिमित्तानं शाहरुख, अनुष्का आणि कतरिनानं आमच्याशी संवाद साधला.

शाहरुख खानचा स्ट्रगल तर सगळ्यांनाच माहीत आहे. दिल्लीहून अभिनय करायला तो मुंबईत आला होता. तेव्हा काम मिळण्यासाठी तो दारोदारी भटकत होता. तो म्हणाला, मी काही बाॅडी बिल्डर नव्हतो. मला घोडेस्वारी येत नव्हती. त्यावेळी अनेकांनी त्याला परत जायचा सल्ला दिला होता. अनेकांना तो झीरो वाटला होता. तो आज आहे सुपर हिरो.

अभिनेत्री कतरिना कैफनंही एक वाईट आठवण शेअर केली. दक्षिणेकडचे कोरिओग्राफर राजू सुंदरम यांनी कॅटला सेटवर सगळ्यांसमोर तू झीरो आहेस असं सांगितलं.

राजू प्रभुदेवाचे भाऊ आहेत. कॅटचे मित्रही आहेत. पण कतरिना त्यावेळी खूप दुखावली गेली. तिला एका गाण्याची स्टेप येत नव्हती. म्हणून तू झीरो आहेस असं राजू म्हणाले होते.

कलाकारांनी सांगितलं, हे सगळे किस्से मिळूनच झीरो बनलाय. आयुष्यात आपण झीरो आहोत, असं वाटणारे क्षण नेहमीच येत असतात. पण प्रयत्नानं प्रत्येक जण झीरोचे हिरो बनतात.

यावेळी कलाकारांनी एक गेम खेळला. त्यात अनेक गुपितं उघड झाली. शाहरुख म्हणाला, तो बाथरूम सिंगर आहे. तर कतरिनानं सांगितलं तिला हिंदी चांगलं बोलता येतं. पण ती घाबरते.

चित्रपटात शाहरुखने बवुआ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सध्या बवुआचे अनेक फोटो सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहेत. फोटोप्रमाणेच चित्रपटातील अनेक वाक्य चाहत्यांच्या तोंडी आहेत. त्यातीलच एक ‘ब से बवुआ आ राहा है’ हे वाक्य तुम्हाला चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक करतं.

'संभाजी' मालिकेतले खलनायक अनाजी पंतांवरच्या मिम्स होतायत व्हायरल

First published: December 19, 2018, 6:15 PM IST

ताज्या बातम्या