मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

बिग बींना कोरोना झाल्यानंतर बॉलीवूडच्या किंग खानने घेतला धसका; व्हायरसच्या भीतीने काय केलं पाहा

बिग बींना कोरोना झाल्यानंतर बॉलीवूडच्या किंग खानने घेतला धसका; व्हायरसच्या भीतीने काय केलं पाहा

आपल्या घरात कोरोनाव्हायरसने (coronavirus) शिरकाव करू नये म्हणून अभिनेता शाहरूख खानने (shahrukh khan) आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.

आपल्या घरात कोरोनाव्हायरसने (coronavirus) शिरकाव करू नये म्हणून अभिनेता शाहरूख खानने (shahrukh khan) आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.

आपल्या घरात कोरोनाव्हायरसने (coronavirus) शिरकाव करू नये म्हणून अभिनेता शाहरूख खानने (shahrukh khan) आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.

    मुंबई, 20 जुलै : महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. बॉलीवूड आणि टीव्ही कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. बच्चन कुटुंबातील चार जणांना कोरोना झाला आहे. बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन, अभिनेत्री ऐश्रर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांनाही कोरोना झाला. यानंतर आता बॉलीवूडच्या किंग खाननेही कोरोनाचा धसका घेतला आहे. अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan) याने कोरोनाच्या भीतीने आपल्या मन्नत (mannat) बंगल्याला प्लॅस्टिकने झाकून घेतलं आहे. खबरदारी म्हणून शाहरूखनं मन्नतच्या चारही बाजूंनी प्लॅस्टिक लावून घेतलं आहे. याच बंगल्यात शाहरूख आपली पत्नी गौरी आणि तीन मुलांसह राहतो. शाहरूखने आपलं पाच मजली ऑफिस कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबई महापालिकेला दिलं आहे. हे वाचा - रुग्णालयात बिग बी वडिलांच्या आठवणीत झाले भावूक; शेअर केली ही कविता बच्चन कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांचे बंगले सील करण्यात आले. अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या या चौघांवरही मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान अभिनेत्री रेखा यांचा सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांचा बंगलाही सील करण्यात आला आहे आणि रेखा यांच्या बंगल्याजवळ असलेला दिग्दर्शक झोया अख्तर यांचाही बंगला सील करण्यात आला. याआधी बोनी कपूर आणि आमिर खानच्या स्टाफलाही कोरोनाची लागण झाली. शिवाय अनुपम खेर यांच्या आईलाही कोरोना झाला आहे. याशिवाय काही टीव्ही कलाकारही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. हे वाचा - रेखाजींनी कोरोना चाचणी करून घ्यावी - मुंबईच्या महापौरांचं आवाहन कोरोनारुग्णांच्या संख्येने राज्यात 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकट्या मुंबईतच 1 लाखांवर रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस खाली येत असला, तरी या रोगाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे धोका कायम आहे. रविवारी  राज्यात तब्बल 8348 नव्या रुग्णांची भर पडली. तर 144 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3,00,937वर गेली आहे. तर एकूण मृत्यू 11596 एवढे झाले आहेत. तर मुंबईत आज 1186 नवे रुग्ण आढळले तर 65 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या 1,00,350 एवढी झाली. तर आत्तापर्यंत 5650 जणांचा मृत्यू झाला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Shahrukh khan

    पुढील बातम्या