Home /News /entertainment /

'Pathaan को कैसे रोकोगे..!' 8 पॅक Abs मध्ये शाहरुखचा जलवा; थक्क करणारा फिटनेस

'Pathaan को कैसे रोकोगे..!' 8 पॅक Abs मध्ये शाहरुखचा जलवा; थक्क करणारा फिटनेस

शाहरुख खानने 8-पॅक अ‍ॅब्स (Shah Rukh Khan eight-pack abs look viral) फ्लाँट करणारा फोटो पोस्ट केला आहे. चाहत्यांसाठी हे अविश्वसनीय आहे की वयाच्या 56 व्या वर्षी किंगखान एवढा फिट आहे.

  मुंबई, 26 मार्च: बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (KKR vs CSK) अशी आयपीएलच्या या सीझनची (IPL 2022) पहिली मॅच होणार आहे. त्यापूर्वी KKR चा मालक शाहरुख खानचा हा फोटो खूपच व्हायरल होत आहे. कारणंही तसंच आहे. शाहरुखने 8-पॅक अ‍ॅब्स (Shah Rukh Khan eight-pack abs look viral) फ्लाँट करणारा फोटो पोस्ट केला आहे. 56 वर्षीय या अभिनेत्याने शर्टलेस लुक शेअर केला आहे. हा फोटो त्याचा आगामी सिनेमा 'पठाण' (Shah Rukh Khan Pathaan Look) मधील असावा अंदाज आहे. अभिनेता सध्या स्पेनमध्ये जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोणसह पठाणचे शूटिंग करत आहे. शाहरुखने हा फोटो शेअर करताना मजेशीर कॅप्शन देखील दिले आहे. तो म्हणतो की, 'शाहरुख जरी थोडा थांबला तरी पठाणला कसे थांबवाल. Apps ही बनवेन आणि Abs देखील.' त्याच्या या कॅप्शनमध्ये SRK+ या त्याच्या 'App' चा संदर्भ आहे. सध्या शाहरुख डिस्ने प्लस हॉटस्टारची जाहिरात करत आहे. ज्यामध्ये असं दाखवण्यात आलं आहे की, शाहरुख SRK+ नावाचं अ‍ॅप लाँच करणार आहे, ज्या App ला डिस्ने प्लस हॉटस्टार टक्कर देत आहे. या जाहिरातीमध्ये 'थोडा रुक शाहरुख' (#ThodaRukShahRukh) असा डायलॉग आहे. त्या अनुषंगाने शाहरुखने या नव्या फोटोचं कॅप्शन दिलं आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

  शाहरुखचा हा फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्यच वाटत आहे. या फोटोतून दिसणारा त्याचा फिटनेस थक्क करणारा आहे. अनेकांनी कमेंट केली आहे की, 'तो खरंच 56 वर्षांचा आहे का?' एका युजरने कमेंट करत त्याला FIRE म्हटलं आहे. 'कुणी याला टक्कर देणारा नाही', अशीही कमेंट एका युजरने केली आहे. हे वाचा-Ranbir Kapoor आणि Alia Bhatt ने सुरू केलं लग्नाचं शॉपिगं? Viral होतोय हा Photo लीक झाले होते पठाणच्या सेटवरील फोटो स्पेनमधील पठाणच्या सेटवरील अनेक फोटोज ऑनलाइन लीक झाल्यानंतर आता शाहरुखचा नवा फोटो समोर आला आहे. या फोटोंमुळे चाहत्यांना चित्रपटातील त्याच्या लुकची पहिली झलक पाहायला मिळाली होती. या फोटोमध्ये बॉलिवूडच्या या बादशाहची टोन्ड बॉडी पाहायला मिळते आहे. लीक झालेल्या फोटोंवरुन स्पेनमध्ये या चित्रपटातील गाण्याचं शूटिंग असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पठाण या सिनेमाकडून SRK च्या चाहत्यांना विशेष अपेक्षा आहेत, कारण शाहरुख तीन वर्षांनी सिनेमा घेऊन येत आहे. हा सिनेमा पुढील वर्षी 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Bollywood actor, Bollywood News, Shah Rukh Khan, Shahrukh khan

  पुढील बातम्या