मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Unfair n Lovely : हीरोला नेहमी 'गोरे गोरे गाल'च का वाटतात सुंदर? इलियानाच्या प्रश्नाने नेटकरी क्लीन बोल्ड

Unfair n Lovely : हीरोला नेहमी 'गोरे गोरे गाल'च का वाटतात सुंदर? इलियानाच्या प्रश्नाने नेटकरी क्लीन बोल्ड

"हीरोला नेहमी हिरोईनचे गोरे गोरे गालच का आकर्षक वाटतात, कधी विचार केलाय?'' असं म्हणत इलियानेने Unfair n Lovey असा हॅशटॅग वापरला आहे.

"हीरोला नेहमी हिरोईनचे गोरे गोरे गालच का आकर्षक वाटतात, कधी विचार केलाय?'' असं म्हणत इलियानेने Unfair n Lovey असा हॅशटॅग वापरला आहे.

"हीरोला नेहमी हिरोईनचे गोरे गोरे गालच का आकर्षक वाटतात, कधी विचार केलाय?'' असं म्हणत इलियानेने Unfair n Lovey असा हॅशटॅग वापरला आहे.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी
मुंबई, 15 ऑक्टोबर : Coronavirus च्या संकटानंतर आता कुठे रखडलेली शूटिंग नव्याने सुरू झाली आहेत. अभिनेत्री इलियाना डिक्रूझने (Ileana D'cruz) तिच्या नवीन प्रोजक्टबद्दल माहिती दिली आहे, पण अगदी वेगळ्या अंदाजात. आपल्या Twitter अकाउंटवरून नवीन चित्रपटाची घोषणा करताना इलियानाने लिहिलं आहे, "हीरोला नेहमी हिरोईनचे गोरे गोरे गालच का आकर्षक वाटतात, कधी विचार केलाय? जुने विचार सोडा आता" तिच्या या पोस्टवरून नेटकऱ्यांना नव्या सिनेमाचा अर्थ लगेच लक्षात आला. #UnfairNLovely  असं लिहित तिने नव्या सिनेमाचं नावंही जाहीर केलं. Covid-19 लॉकडाऊननंतर बऱ्याच दिवसांनी नवीन चित्रपटाची घोषणा केली जात आहे. रणदीप हुडा (Randeep Hooda) आणि इलियाना डिक्रूज यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. अनफेयर अँड लवली असं या चित्रपटाचे नाव असून सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडियाने या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून यामध्ये गोऱ्या रंगाबद्दल असणारं आकर्षण आणि त्याभोवतीचे विषय पाहायला मिळतील. हरियाणामधल्या एका सावळ्या मुलीची ही कथा असून आपल्या या रंगामुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशी गोष्ट आहे. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. अभिनेता रणदीप हुडा पहिल्यांदाच विनोदी धाटणीच्या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शक आणि लेखन बलविंदर सिंह जंजुआ यांनी केलं असून त्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट असणार आहे. याआधी त्यांनी सांड की आंख' आणि  'मुबारकां यांसारखे सिनेमे लिहिले आहेत.  हा चित्रपट देखील बलविंदर सिंह जंजुआ यांनी  रूपिंदर चहल आणि  अनिल रोहन यांच्याबरोबर लिहिला आहे. चित्रपटाला अमित त्रिवेदी यांनी संगीत दिलं असून इर्शाद कामिल यांनी गाणी लिहिली आहेत. या चित्रपटाविषयी बोलताना इलियाना डिक्रूज म्हणाली, "या चित्रपटातील लव्हली नावाच्या मुलीची भूमिका साकारताना खूप मजा आली. प्रेक्षकांना हे कॅरेक्टर खूप आवडेल, आपलंसं वाटेल याची खात्री आहे."  रणदीप हुड्डा म्हणाला, "कॉमेडी भूमिका मी खूप वर्षानंतर करणार आहे. या चित्रपटाची कथा मला खूप आवडली असून चित्रिकरणाची वाट पाहतोय", दरम्यान, सोनी पिक्चर्स फिल्म्स इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर विवेक कृष्णानी यांनी म्हटले, समाजावर प्रभाव टाकणाऱ्या कथा आणि कंटेंट दाखवण्यावर आमचा भर असतो. आम्ही नवीन प्रतिभा असणाऱ्या कलाकारांना नेहमीच संधी देतो. यामध्ये नवीन लेखक आणि अभिनेत्यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे हा कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना आवडण्याची आशा देखील त्यांनी व्यक्त केली.
First published:

Tags: Bollywood

पुढील बातम्या