Home /News /entertainment /

बॉलिवूडचा ज्येष्ठ अभिनेता रुग्णालयात भरती; Neuromuscular च्या अत्यंत दुर्मीळ आजाराची लागण!

बॉलिवूडचा ज्येष्ठ अभिनेता रुग्णालयात भरती; Neuromuscular च्या अत्यंत दुर्मीळ आजाराची लागण!

‘चाणक्य’, ‘स्वाभिमान’, ‘कुमकुम’ सीरियल आणि ‘3 इडियट्स’ (3 Idiots), ‘केदारनाथ’ (Kedarnath), ‘पानीपत’ ‘मनमर्जियां’, ‘पीके’, ‘बर्फी’ सारख्या तब्बल 40 चित्रपटात भूमिका साकरलेले अभिनेते अरुण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    नवी दिल्ली, 21 जानेवारी : अरुण बाली (Arun Bali) आजारी असल्याचं वृत्त समोर आलं आहे. ‘चाणक्य’, ‘स्वाभिमान’, ‘कुमकुम’ सीरियल आणि ‘3 इडियट्स’ (3 Idiots), ‘केदारनाथ’ (Kedarnath), ‘पानीपत’  ‘मनमर्जियां’, ‘पीके’, ‘बर्फी’ सारख्या तब्बल 40 चित्रपटात भूमिका साकरलेले अभिनेते अरुण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 79 वर्षीय अरुण Myasthenia Gravis नावाच्या न्यूरोमस्कुलर दुर्मीळ आजाराने पीडित आहेत. तब्येत बिघडल्यानंतर अरूण यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. (Bollywood senior actor Arun Bali admitted to hospital Extremely rare neuromuscular disease) अरुण बाली यांना बोलताना होतेय त्रास टाइम्सच्या वृत्तानुसार, CINTAA यानी सिने एँड टीवी आर्टिस्ट एसोसिएशनचे मेंबर नुपुर अलंकार यांनी अरुण बाली यांना फोन केला तर त्यांना बोलताना त्रास होत असल्याची जाणीव झाली. नुपूर बऱ्याच काळापासून अरूण यांना ओळखते. नुपूरने ईटाइम्सला याबाबत सांगितलं. त्यांना बोलताना त्रास होत होता, हे पाहून नुपूरने त्यांचा मुलगा अंकुशला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य झालं नाही. त्यानंतर अंकुशच्या सोबत काम करणारा राजीव मेनन याला कॉल करून त्याचा दुसरा नंबर घेतला. यानंतर अरूण बाली यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हे ही वाचा-लतादीदींच्या उपचारासाठी मुंबईच्या रिक्षावाल्याने दिली आयुष्यभराची पुंजी अरुण बाली न्यूरोच्या दुर्मीळ आजाराने पीडित अरुण बालीच्या मुलीने नुपूर यांना त्यांच्या आजाराबद्दल सूचना दिली. त्यांना Myasthenia Gravis नावाचा दुर्मीळ आजाराची लागण झाली आहे. या ऑटोइम्यूम दुर्मीळ आजारामुळे नसा आणि पेशींमधील ताळमेळ होत नाही. ज्यामुळे नीट बोलता येत नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bollywood actor, Health

    पुढील बातम्या