'अब तक 56'चे लेखक रविशंकर यांची आत्महत्या

'अब तक 56'चे लेखक रविशंकर यांची आत्महत्या

नाना पाटेकरची भूमिका असलेल्या 'अब तक 56' या चित्रपटाचे पटकथा लेखक रविशंकर यांनी आत्महत्या केली आहे. 32 वर्षाच्या रविशंकर आलोक यांनी मुंबईत राहत्या इमारतीवरुन उडी मारली.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : नाना पाटेकरची भूमिका असलेल्या 'अब तक 56' या चित्रपटाचे पटकथा लेखक रविशंकर यांनी आत्महत्या केली आहे. 32 वर्षाच्या रविशंकर आलोक यांनी मुंबईत राहत्या इमारतीवरुन उडी मारली. रविशंकर मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात सात बंगला परिसरात असलेल्या वसंत सोसायटीत राहत होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांनी सात मजली इमारतीच्या टेरेसवरून उडी मारली. या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रविशंकर भावासह भाड्याच्या घरात राहत होता. रविशंकर गेले अनेक दिवस तणावाखाली असून त्याच्यावर डॉ. पाटकर उपचार करत असल्याची माहिती त्याच्या भावाने दिली.

हेही वाचा

थायलंडच्या गुहेतून मुलांना 'असं' काढलं बाहेर, रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO आला समोर

साताऱ्यात तडीपार गुंडाचा खून, शाळेच्या आवारात सापडला मृतदेह

आता मुंबई महाविद्यालयांमध्ये मिळणार भगवदगीता

रविशंकरचे आईवडील काही दिवस त्यांच्या सोबत राहत होते. रविशंकर बिहारचे होते. आईवडील त्यांच्या गावाला परतले होते.  इमारतीच्या वाॅचमननं दिलेल्या माहितीनुसार इमारतीची गच्ची नेहमी बंद असते. रविशंकर  तिथे कसे पोचले हाच प्रश्न आहे. वाॅचमननं मोठा आवाज ऐकला तेव्हा तो धावत गेला. रविशंकर त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना लगेच हाॅस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. पोलीस पुढचा तपास करतायत.

First published: July 12, 2018, 1:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading