'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान

'या' आजाराला तोंड देतेय सारा अली खान

काॅफी विथ करण शोमध्ये तिनं सांगितलं की तिचं या आजारामुळे वजन वाढलं होतं.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : केदारनाथ सिनेमातून डेब्यू करत असलेली सारा अली खान किती सुंदर दिसते. फिट दिसते. ती नियमित जिमला जाते. हेल्थी डाएटही करतेय. पण काही वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. सारा एका आजाराशी सामना करतेय.

काॅफी विथ करण शोमध्ये तिनं सांगितलं की तिचं या आजारामुळे वजन वाढलं होतं. तिच्या आजाराचं नाव आहे पीसीओएस. यात ओव्हरीजमध्ये गाठी येतात. यात वजनही खूप वाढतं. आणि मग ते कमी करणं हे खूप मोठं आव्हान असतं.

साराचंही वजन 96 किलो झालं होतं. तिनं ते प्रयत्नपूर्वक कमी केलं. करण जोहरचा प्रसिद्ध शो कॉफी विथ करण सिझन-6 मध्ये सैफ अली खान आणि त्याची मुलगी सारा अली खान आले आहेत. या शोमध्ये दोघांनीही फार धमाल केल्याचं दिसून येत आहे. कार्यक्रमाचा टिजर नुकताच ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्यात सारा अली खानला कोणासोबत लग्न करायला आवडेल याबद्दल तिने उलगडा केला आहे.

कार्यक्रमात साराने सांगितले की तिला रणबीर कपूरसोबत लग्न करायला आवडेल आणि सध्या चर्चेत असलेला अभिनेता कार्तिक आर्यनसोबत डेट करायची आहे.

यावर सैफ अली खानने उत्तर दिलं की, ‘कार्तिकडे पैसा आहे का? जर त्याच्याकडे पैसा आहेत तर जा..’ सैफने दिलेल्या उत्तरावर सारा अली खानने, ‘हे तुम्हाला शोभत नाही’ असंही म्हटलं आहे.

रणवीर सिंग आणि सारा अली खान हे पहिल्यांदाच सिंबा या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि धर्मा प्रोडक्शन निर्मित असलेला हा सिनेमा येण्यापूर्वीच चर्चेत आहे. सिंबा हा तेलगू भाषेतील टेंपर या चित्रपटाचा रिमेक असणार आहे.

दीपिका-रणवीरच्या पहिल्या रिसेप्शन पार्टीसाठी बॉलिवूडला आमंत्रण नाही

First published: November 20, 2018, 1:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading