सपना चौधरीनं खुलेआम मित्राला म्हटलं आय लव्ह यू, VIDEO व्हायरल

सपना चौधरीनं खुलेआम मित्राला म्हटलं आय लव्ह यू, VIDEO व्हायरल

सपना चौधरीच्या धमाकेदार डान्सबरोबर तिचा बिनधास्त अंदाज लोकांना आवडतो. सपना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलीय ती एका व्हिडिओमुळे.

  • Share this:

मुंबई, 16 मार्च : हरियाणाची डान्सर, बिग बाॅसची स्पर्धक आणि आता बाॅलिवूड अभिनेत्री सपना चौधरी नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणानं चर्चेत असते. तिच्या धमाकेदार डान्सबरोबर तिचा बिनधास्त अंदाज लोकांना आवडतो. सपना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलीय ती एका व्हिडिओमुळे.

या व्हिडिओत सपना प्रेमाची कबुली देतेय. तिच्या मागे एका मुलाचा आवाज येतोय, त्याला सपनानं आपला बाॅयफ्रेंड बनवलंय.

हा एक टिकटाॅक व्हिडिओ आहे. त्यात सपना अभिनय करताना दिसतेय. यात ती म्हणतेय, मला तुला काही सांगायचंय. आय लव्ह यू. त्यावर तो म्हणते तू फ्रेंड म्हणून लव्ह करतेस हे खूप वेळा ऐकलंय. त्यानंतर तिचं उत्तर आहे, आता फ्रेंडला बाॅयफ्रेंड म्हणून रिप्लेस कर. हा व्हिडिओ तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

सध्या सपना चौधरीला टिकटाॅक व्हिडिओचा खुमार चढलाय. ती इन्स्टाग्रामवर असे व्हिडिओ शेअर करतेय आणि ते सोशल मीडियावर हिट होतायत. कोट्यवधी लोक तो पाहतायत.

काही दिवसांपूर्वी सपना चौधरी हिने तिच्या पाठीवर एक टॅटू काढला होता. त्याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले.

टॅटूचे फोटो शेअर करताच ते सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल झाले होते. या टॅटूमध्ये तिने दोन शब्द लिहिले होते.सपनाने तिच्या पाठीवर 'देसी क्वीन' असं लिहिलं होतं. त्यावर 'हो तूच खरी देसी क्वीन आहे' अशा कमेंट्स तिच्या चाहत्यांनी केल्या होत्या.

First published: March 16, 2019, 12:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading