S M L

'संजू' सिनेमात 'या' पाच गोष्टी नाही !

सिनेमाच्या निर्मित्तीत संजयने या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले की कोणत्याही अभिनेत्यावर किंवा प्रसिद्ध व्यक्तीवर या सिनेमाचा प्रभाव पडू नये

Sachin Salve | Updated On: Jun 30, 2018 11:18 PM IST

'संजू' सिनेमात 'या' पाच गोष्टी नाही !

30 जून : 'संजू', नुकताच रिलीज झालेला हा सिनेमा 'संजय दत्त' च्या आयुष्यावरील बायोपिक असून सध्या चांगलाच चर्चेत आहे. खूप दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चांमध्ये रंगलेल्या या सिनेमाने रिलीजनंतर एक वेगळेच वळण घेतलंय.  प्रेक्षकांच्या अपेक्षांमध्ये गुंतलेले या सिनेमाचे बॉलिवुडचे सिक्रेट्स आता सिक्रेट्सच राहिले आहेत कारण या सिनेमात संजय दत्तचे आत्मचरित्र रेखाटले असूनही त्याच्याशी या सिनेमाचा संबंध लांबचाच राहिलाय.

सलमान खान च्या भुमिकेत अपेक्षित असणारा अभिनेता 'जिम सरभ' हा संजयला ड्रग्स् आणि अंमली पदार्थांच्या सवयी लावणारा असा इसम आहे, ज्याचा सलमानशी काहीही संबंध नव्हता.

आपल्या रावडी लुकमुळे मुलींमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या संजयचं बॉलिवुडमध्ये बऱ्याच अभिनेत्र्यांशी नाव जोडले गेले होते. प्रामुख्याने माधुरी दीक्षित यामध्ये नेहमीच चर्चेत असायची परंतु प्रेक्षकांची ही अपेक्षा सुद्धा या सिनेमात पूर्ण झाली नाही.

Loading...

'हसिना मान जाएगी', 'एक और एक ग्यारह' आणि 'दो कैदी' सारखे चित्रपट गाजवलेल्या संजय आणि गोविंदा यांच्या जोडी नंबर वन ला सुद्धा या सिनेमात जागा मिळाली नाही.

सिनेमात प्रथमदर्शी संजयचा मित्र कुमार गौरव च्या भूमिकेत वाटणारा विकी कौशल हा त्याचा तो मित्र नसून त्याला अमेरिकेत भेटलेल्या एका मित्राच्या भूमिकेत आहे जेव्हा संजय आपल्या आईच्या उपचारांकरता अमेरिकेला जातो.

सिनेमाच्या निर्मित्तीत संजयने या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले की कोणत्याही अभिनेत्यावर किंवा प्रसिद्ध व्यक्तीवर या सिनेमाचा प्रभाव पडू नये. तसंच दत्त परिवारातील सदस्यांव्यतिरिक्त या सिनेमात कोणालाही ओळखणे तसं कठीणच आहे. शिवाय आपल्या पहिल्या पत्नी आणि मुलगी त्रिशाला यांचाही संदर्भ या सिनेमात नसल्याचे आढळून येते.

'संजू' सिनेमा आहे तरी कसा?

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2018 11:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close