'संजू'ची 'दंगल'ला धोबीपछाड!

'संजू'ची 'दंगल'ला धोबीपछाड!

आता संजू 200 कोटींच्या क्लबमध्ये समील झालाय. संजू सिनेमा या वर्षीचा सर्वात मोठा ओपनर सिनेमा बनला आहे. पहिल्या सात दिवसांतच 'संजू'नं अामिर खानचा '3इडिअट्स' आणि 'दंगल'चे रेकॉर्ड तोडले आहेत.

  • Share this:

मुंबई, 07 जुलै : रणबीर कपूरच्या 'संजू'ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार एंट्री केलीय. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार बाहुबली सिनेमासारखा दुसरा कुठलाही सिनेमा बॉक्सऑफीसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करू शकणार नाही. पण संजू सिनेमाने तिसऱ्याच दिवशी हे भाकित खोटे ठरवले आहे. आता संजू 200 कोटींच्या क्लबमध्ये समील झालाय. संजू सिनेमा या वर्षीचा सर्वात मोठा ओपनर सिनेमा बनला आहे. पहिल्या सात दिवसांतच 'संजू'नं अामिर खानचा '3इडिअट्स' आणि 'दंगल'चे रेकॉर्ड तोडले आहेत.

सहाव्या दिवसापर्यंत संजूने एकूण 186.41 करोडची कमाई केली होती तर सातव्या दिवशी हा सिनेमा 200 करोडच्या क्लबच्या यादीत आलाय. आणि विशेष म्हणजे हा सिनेमा कुठल्याही खास सण, सुट्टीच्या दिवशी रिलीज झाला नव्हता.

या आठवड्यात दुसरा कुठलाही नवीन हिंदी सिनेमा रिलीज न होण्याचाही फायदा संजू सिनेमाला झाला. 200 करोड क्लबच्या यादीत समाविष्ट होणारा रणबीर कपूरचाही हा पहिलाच सिनेमा आहे.

First published: July 7, 2018, 11:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading