• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • 'मी बजरंग बलीचा भक्त ... ' बायोग्राफीच्या प्रश्नावर सलमाननं दिलं अजब उत्तर

'मी बजरंग बलीचा भक्त ... ' बायोग्राफीच्या प्रश्नावर सलमाननं दिलं अजब उत्तर

तुला आत्मचरित्र (Biography) लिहिण्याची इच्छा आहे का,` असा प्रश्न सलमानला. विचारण्यात आला. त्यावर आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं.

  • Share this:
मुंबई, 14सप्टेंबर-  बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटीजच्या खासगी आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. अनेक अभिनेते-अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या घडामोडी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून नेहमीच शेअर करत असतात. यावर त्यांचे चाहतेही व्यक्त होतात. बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं (Salman Khan) वैयक्तिक आयुष्य हा नेहमीच चाहत्यांसाठी औत्सुक्याचा विषय राहिला आहे. नवा चित्रपट असो, एखादा इव्हेंट असो किंवा अगदी सलमान खान लग्न केव्हा करणार हा विषय असो, याबाबतच्या चर्चा नेहमीच होत असतात. त्यावर त्याचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून मत प्रदर्शन करत असतात. सलमान खान त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांच्यासमवेत एका इव्हेंटला उपस्थित होता. या वेळी त्याला ` तुला आत्मचरित्र (Biography) लिहिण्याची इच्छा आहे का,` असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सलमाननं आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर दिलं. बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान एका इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. यावेळी सलमान खान नेमक्या कोणत्या विषयावर बोलणार, प्रतिक्रिया देणार याविषयी त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. त्या वेळी त्याला बायोग्राफी लिहिण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तसंच `सलमान लग्न (Marriage) कधी करणार,` असा प्रश्न सलीम खान यांना विचारण्यात आला. त्यावर `सलमान लग्न कधी करणार हे अल्लाह मियॉंलाही ठाऊक नाही,` असं उत्तर सलीम खान यांनी दिलं. `माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी लोक फारच उत्सुक असतात,` अशी प्रतिक्रिया या प्रश्नावर सलमान खाननं दिली. बायोग्राफी लिहिणार का, या प्रश्नावर सलमाननं क्षणार्धात 'नाही' असं उत्तर दिलं. `यामागे दोन कारणं आहेत आणि ती माझ्या चाहत्यांना माहिती आहेत. एक म्हणजे मी कधीही खोटं बोलत नाही आणि दुसरं म्हणजे मी बजरंग बलीचा भक्त आहे,` असं सलमान खाननं स्पष्ट केलं. (हे वाचा:जॅकलिन फर्नांडिसचं खास सेलेब्रेशन; किन्नर ट्र्स्टला भेट देत साजरा केला गणेशोत्सव) सलमान खाननं 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाच्या माध्यमातून आपण बजरंग बलीचे भक्त असल्याचं अधोरेखित केलं होतं. मूव्ही टॉकीजशी बोलताना तो म्हणाला होता, की `मी बजरंग बलीचा निस्सीम भक्त आहे.`बायोग्राफीविषयी पत्रकारांनी सलमान खानला प्रश्न विचारला असता, सलीम खान म्हणाले, की `तुम्हीच सलमानची बायोग्राफी लिहा. माझ्याकडे सलमानविषयी खूप माहिती तयार आहे. परंतु, बायोग्राफी लिहिण्याची त्याची इच्छा नाही.`यावर सलमान खान म्हणाला, `मी बजरंगबलीचा भक्त आहे. त्यामुळे मी खोटं बोलू शकत नाही. बायोग्राफीत बरंच खोटं लिहावं लागतं. त्यामुळे ते मला शक्य नाही. मी बायोग्राफी लिहिणार नाही.`त्यामुळं बायोग्राफी आणि लग्न अशा दोन्ही वैयक्तिक प्रश्नांना सडेतोड उत्तरं देऊन सलमान खाननं या चर्चांवर पुन्हा एकदा पडदा टाकला.
First published: