मुंबई, 03 जानेवारी : सिनेमात भल्या भल्यांना जेरीला आणणाऱ्या सलमान खानला एकदा रस्त्यात मार खावा लागलाय, असं सांगितलं तर खरं वाटेल? पण हे खरं आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये खुद्द सलमाननं सांगितलं.
कपिलच्या शोमध्ये सलमान, सोहेल आणि अरबाज हे तिघं भाऊ एकत्र आले होते. यावेळी कपिलनं तुमची शाळेत मारामारी व्हायची का, असा प्रश्न विचारला. तेव्हा सोहेलनं एक किस्सा सांगितला. एकदा बँड स्टँडला त्यांच्या घराखाली एका फॅननं लक्ष वेधून घेण्यासाठी शिव्या द्यायला सुरुवात केली. सोहेलला वाटलं, तो एकटाच असेल म्हणून त्यानं विचारलं शिव्या का देतोयस? त्यावर अनेक जण येऊन सोहेलला मारायला लागले.
त्यानंतर सलमान म्हणाला, ' मी सोहेलच्या मदतीला आलो. तसा माझ्या पाठीतही बांबूचा मार पडला. एरवी सिनेमात तो बांबू तुटतो. पण त्यावेळी चांगलंच लागलं.' सलमाननं हे अॅक्शन करून दाखवलं.
Jab ladhai ki baat aayi, toh dekhiye Sohail aur Salman ne kaunsi kahaani bataayi! #TheKapilSharmaShow, Sat-Sun raat 9:30 baje. @KapilSharmaK9 @kikusharda @haanjichandan @Krushna_KAS @bharti_lalli @sumona24 @trulyedward @banijayasia @BeingSalmanKhan @arbaazSkhan @SohailKhan pic.twitter.com/3fk8e9gTdK
— Sony TV (@SonyTV) 2 January 2019
कपिल शर्माच्या शोमध्ये या वीकेण्डला सलमान आणि त्याचे भाऊ येतायत. या शोचे ते निर्मातेही आहेत.
अभिनेता सलमान खानचे फॅन्स असोत वा त्याच्यावर टीका करणारे असोत. सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय. त्या प्रश्नाचं उत्तर ते शोधत असतात. तो म्हणजे सलमान लग्न कधी करणार? पण एका अभिनेत्यामुळे सल्लूमियाँनं लग्न केलं नाही.
कपिल शर्माच्या शोमध्ये सलमानं या प्रश्नाचं उत्तर दिलंय. तो म्हणाला, एकदा संजय दत्त मला लग्नाचे फायदे समजवून सांगत होता. तू शूटिंगहून थकून येशील. तुझी पत्नी घरी तुझी काळजी घेईल. तुझं डोकं दाबून देईल. हे सर्व सांगताना त्याचा फोन सारखा वाजत होता. शेवटी माझ्याशी बोलायचं थांबून त्यानं फोन उचलला. हे सांगताना सलमानला हसू आवरत नव्हतं.