मुंबई, 02 जानेवारी : अभिनेता सलमान खानचे फॅन्स असोत वा त्याच्यावर टीका करणारे असोत. सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय. त्या प्रश्नाचं उत्तर ते शोधत असतात. तो म्हणजे सलमान लग्न कधी करणार? पण एका अभिनेत्यामुळे सल्लूमियाँनं लग्न केलं नाही.
कपिल शर्माच्या शोमध्ये सलमानं या प्रश्नाचं उत्तर दिलंय. तो म्हणाला, एकदा संजय दत्त मला लग्नाचे फायदे समजवून सांगत होता. तू शूटिंगहून थकून येशील. तुझी पत्नी घरी तुझी काळजी घेईल. तुझं डोकं दाबून देईल. हे सर्व सांगताना त्याचा फोन सारखा वाजत होता. शेवटी माझ्याशी बोलायचं थांबून त्यानं फोन उचलला. हे सांगताना सलमानला हसू आवरत नव्हतं.
याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. या वीकेण्डला ही सलमानची धमाल पाहायला मिळेल. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पहा.
नुकताच सलमान खानचा वाढदिवस झाला. तो 53 वर्षांचा झालाय. नेहमीप्रमाणे त्यानं रात्री फार्म हाऊसवर जंगी पार्टी ठेवली. यावेळी त्यानं मीडियाशीही गप्पा मारल्या.
सलमान म्हणाला, वाढदिवसानिमित्त त्याच्या आईनं त्याच्याकडे खास गिफ्ट मागितलंय. ते काय आहे ठाऊकेय? त्याची आई म्हणाली, आता फोर पॅक खूप झाले. सिक्स पॅक घेऊन ये.त्यासाठी तो खूप मेहनत करतोय. सकाळ-संध्याकाळ जिमला जातोय. धावायचा व्यायाम करतोय. शिवाय खाण्यावरही नियंत्रण ठेवतोय.
कदाचित पुढच्या वर्षापर्यंत हे सिक्स पॅक तयार होतील आणि भारत सिनेमात ते पाहायला मिळतील. सलमान म्हणाला, मी आईला दिलेली ही भेट ट्विटरवर शेअर करेन.सलमान आपल्या आईशी खूप अॅटॅच्ड आहे.
बाॅलिवूड सुपरस्टार सलमान खान आत्तापर्यंत भारत सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी होता. तो दीपवीर आणि प्रियांका-निकच्या लग्नालाही आला नव्हता. पण सल्लूमियाँ थायलंडला एका लग्नासाठी गेला होता. तिथे त्यानं उपस्थितांना वेडंच केलं.
कतरिनाच्या बहिणीपासून ते ज्युनिअर सनी देओलपर्यंत, हे कलाकार बॉलिवूडमध्ये करणार एण्ट्री