02 नोव्हेंबर : बिग बॉस मास्टर सलमान खान आणि हॉलिवूड क्वीन प्रियांका चोप्रा त्यांच्या चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतात. पण आता हे दोघे चर्चेत आले ते एका वेगळ्याच कारणाने. जगभरातल्या 500 मोठ्या हस्तींमधून हे दोघे भारताच्या टॉप लिस्टमध्ये आहे.
व्हरायटी मासिक प्रत्येक वर्षी 500 प्रभावी हस्तींची यादी घोषित करते. त्यात देशभरातील अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांची नावं असतात. या वेळेस भारतातल्या 12 लोकांची नावं या यादीमध्ये आहेत. या 12 लोकांमध्ये सगळ्यात वरचं नाव आहे ते सलमान खान आणि प्रियांका चोप्राचं. यानंतर करण जोहर, आदित्य चोप्रा, एकता कपूर, अंबानी बंधू, सिद्धार्थ रॉय कपूर, पुनीत गोएंका, किशोर लुला, उदय शंकर आणि सुभाष चंद्रा यांची नावं आहेत. या यादीमध्ये ग्लोबल एंटरटेनमेंट उद्योग व्यवसायात 2 ट्रिलियन डॉलर्सचे योगदान देणाऱ्या मंडळींचीच नावं आहेत.
व्हरायटी मासिकाच्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'शाहरुख खान आणि आमिर खानच्या व्यतिरिक्त अभिनेता सलमान खानने आजही बॉक्स ऑफिसवर त्याची पकड कायम ठेवली आहे.'
Salman Khan is one of the unrelated Khan triumvirate comprising Aamir and Shah Rukh that has been ruling the Bollywood box office for decades. He is now part of #Variety500 presented by @verizondigital https://t.co/hSv5BeehQj pic.twitter.com/EjJeVMM2Qk
Loading...— Variety (@Variety) November 30, 2017
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा