Home /News /entertainment /

सैफ अली खानच्या चाहत्यांसाठी आणखी एक सरप्राइज, केली 2020 मधील दुसरी मोठी घोषणा

सैफ अली खानच्या चाहत्यांसाठी आणखी एक सरप्राइज, केली 2020 मधील दुसरी मोठी घोषणा

अभिनेत्रा सैफ अली खानसाठी (Saif Ali Khan) 2020 हे वर्ष खास आहे. सैफ आणि त्यानी पत्नी अभिनेत्री करीना कपूर यांनी दुसऱ्या बाळाच्या स्वागताची तयारी केली आहे. दरम्यान सैफच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.

    मुंबई, 25 ऑगस्ट : अभिनेत्रा सैफ अली खानसाठी (Saif Ali Khan) 2020 हे वर्ष खास आहे. सैफ आणि त्यानी पत्नी अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor Khan) यांनी दुसऱ्या बाळाच्या स्वागताची तयारी केली आहे. दरम्यान सैफच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. सैफच्या चाहत्यांना हे ठाऊकच आहे की, त्याला पुस्तकांची किती आवड आहे. त्याचे काही पुस्तक वाचताना फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता पुस्तकांची आवड असलेला अभिनेता आत्मचरित्र लिहणार आहे. यामध्ये तो त्याचे कटुंब, करिअर, यश-अपयश याबाबत नमुद करणार आहे. त्याचप्रमाणे त्याची प्रेरणा काय होती, याबाबत देखील भाष्य करण्यात येणार आहे. सैफ अली खानला छोटे नवाब देखील म्हटले जाते. कारण त्याचे वडील नवाब मन्सूर अली खान पटौदी होते. मन्सूर अली खान पटौदी हे भारतीय क्रिकेट संघातील महत्त्वाचे खेळाडू होते. तर सैफची आई शर्मिला टागोर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. लहानपणापासूनच सैफच्या घरी क्रिकेट आणि अभिनय दोहोंचे वातावरण आहे. मोठा झाल्यावर सैफने चित्रपटसृष्टीत आपले करियर बनवण्याकडे कल दाखविला. पण सुरुवातीच्या काळात त्याला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागले होते.  तो बराच काळ चित्रपटांचा एकटा हिरो होऊ शकला नाही, बऱ्याचदा तो सहाय्यक भूमिका करताना दिसला. एका काळाच्या संघर्षानंतर त्याने स्वत: ला चित्रपटसृष्टीत एक खास स्थान बनवून घेतले. 'ओंकारा' चित्रपटातील 'लंगडा त्यागी' ही व्यक्तिरेखा त्याचे सिनेसृष्टीतील स्थान अढळ करणारी ठरली. (हे वाचा-'सुशांतच्या खोलीत कुणी येऊ शकत नव्हतं', CBI रिक्रिएशनमध्ये गोष्टींचा उलगडा) टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, सैफ अली खान लेखक बनण्याबद्दल असा म्हणाला की,  'बर्‍याच गोष्टी बदलत आहेत, मला वाटते यावेळी जर मी त्यांना जपून ठेवले नाही तर त्या कदाचित हरवतील. अशाप्रकारे आठवणी ताज्या करणे खूप सुंदर आहे आणि त्या जपून ठेवणे त्यापेक्षा सुंदर. कदाचित मी थोडा स्वार्थी असेन पण खरोखर हे खूप सुंदर आहे. मला पुस्तके खूप आवडतात, कदाचित म्हणूनच मी हे पाऊल उचलत आहे.' (हे वाचा-SSR Case: शिबानी दांडेकर मिस्ट्री गर्ल असल्याचा दावा, भडकली फरहानची गर्लफ्रेंड) दरम्यान सैफच्या या ऑटोबायोग्राफीचे नाव काय असेल हे अद्याप निश्चित झाले नाही आहे. लवकरच याबाबत माहिती समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान मीडिया अहवालानुसार सैफचे आत्मचरित्र पुढील वर्षी प्रकाशित होण्याची शक्यता आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Kareena Kapoor, Saif Ali Khan

    पुढील बातम्या