जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी ICU मध्ये दाखल

जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी ICU मध्ये दाखल

अचानक प्रकृती खालवल्यानं ऋषी कपूर यांना मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात ICU मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. रुग्णालयातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऋषी कपूर यांना कर्करोगाशी संबंधीत समस्या आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळत आहे. रात्री उशिरा त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं. डॉक्टरांची टीम सध्या त्यांच्यावर उपचार करत असून प्रकृती स्थिर असल्याचंही सांगत आहे. ऋषी कपूर यांची प्रकृती बिघडल्याच्या वृत्ताला त्यांचे बंधू रणधीर कपूर यांनी दुजोरा दिला आहे.

ऋषी कपूर यांना 2018 रोजी पहिल्यांदा कर्करोग असल्याचं समोर आलं. त्यानंतर जवळपास 8 महिने न्यूयॉर्कमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले. याआधी ऋषी कपूर किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणीही या आजाराबाबत खुलासा केला नव्हता. नंतर त्यांनी स्वत: आपल्या फॅन्सना या आजाराबाबत माहिती दिली होती.

हे वाचा-कॅन्सरसमोरही हार मानली नव्हती मात्र आईच्या मृत्यूनंतर इरफान हरले आयुष्याशी झुंज

न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर जेव्हा उपचार सुरू होते तेव्हा त्यांच्यासोबत या कठीण काळात त्यांची पत्नीही सोबत होती. आठवड्याभराआधीही ऋषी कपूर यांना त्रास झाला होता अशी माहिती मिळत आहे मात्र त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना 4 दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता. मध्यरात्री पुन्हा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे वाचा-फक्त पत्नीसाठी पुन्हा इरफानला जगायचं होतं, व्यक्त केली होती इच्छा

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 30, 2020, 7:04 AM IST

ताज्या बातम्या