मुंबई, 08 नोव्हेंबर: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी (Sushant Singh Rajput Death Case) ड्रग कनेक्शन समोर आल्याने संपूर्ण बॉलिवूड हादरले होते. याप्रकरणी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा (Rhea Chakraborty) भाऊ शोविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) अद्यापही तुरुंगात आहे. सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या एका आदेशाचा हवाला देत शोविकने तिसऱ्यांदा जामीनासाठी अर्ज केला आहे. एनसीबीने (NCB) शोविकला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती.
याआधी विशेष न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्या जामीन याचिका फेटाळल्या आहेत. शोविकने नार्कोटिक्स कंट्रोल अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्याशी संबंधित सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयासमोर दाखल केलेल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या अलिकडील आदेशाचा संदर्भ दिला. ज्यामध्ये असे म्हटले आहे की एनसीबी अधिकाऱ्यांसमोर दिलेली 'कबुलीजबाबांची विधाने' पुरावा मानली जाऊ शकत नाहीत.
(हे वाचा-NUDE फोटोमुळे मिलिंद सोमणवर FIR दाखल झाल्यानंतर व्हायरल होत आहेत हे PHOTOS)
शोविकने त्याच्या याचिकेमध्ये असे म्हटले आहे की, 'सर्वोच्च न्यायालयाने आपल्या नुकत्याच दिलेल्या आदेशात उचित निर्णय दिला की ज्या अधिकाऱ्यांना एनडीपीसी कायद्यांतर्गत (सध्याच्या प्रकरणाशी संबंधित) अधिकार देण्यात आले आहेत ते पुरावे कायद्याच्या कलम 25 च्या कक्षेत येतात. यामुळे एनडीपीएस कायद्यांतर्गत त्यांना दिलेल्या कबुलीजबाबावरून एखाद्या आरोपीला दोषी ठरविण्याचा विचार करता येणार नाही. ' यात असे म्हटले होते की पुरावे कायदा कलम 25 नुसार कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यासमोर देण्यात आलेला जबाब आरोपीच्या विरोधात वापरता येत नाही.
'चुकीच्या पद्धतीने गुंतवले'
शोविकचे वकिल सतिश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी याबाबत याचिका दाखल केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, ''सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती स्पष्टपणे बदलली आहे त्यामुळे जामीनावर पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.' शोविकने या याचिकेत पुन्हा नमूद केले की, या प्रकरणात त्याला 'चुकीच्या पद्धतीने गुंतवले' गेले आहे. याचिकेत म्हटले आहे की आरोपीविरूद्ध विचार न करता कलम 27 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(हे वाचा-नाना पाटेकर-जेनेलियाचा हा सिनेमा TV वर होणार प्रदर्शित, 10 वर्ष रखडलं प्रदर्शन)
एका महिन्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने शोविकची जामीन याचिका फेटाळली होती, त्याचवेळी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मात्र याप्रकरणी जामीन मिळाला होता. सप्टेंबर महिन्यात दोघांना अटक करण्यात आली होती. NCB च्या केसनुसार शोविक काही ड्रग पेडलर्सच्या संपर्कात होता आणि तो सुशांतला ड्रग पुरवत असे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी आत्महत्या केली, त्यानंतरच्या तपासात हे ड्रग कनेक्शन समोर आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Sushant Singh Rajput