दिलदार अक्षय कुमार, फानी चक्रीवादळातील पीडितांसाठी केली 1 कोटींची मदत

दिलदार अक्षय कुमार, फानी चक्रीवादळातील पीडितांसाठी केली 1 कोटींची मदत

नागरिकत्वाच्या विवादामुळे गेल्या काही दिवसांपासून बातम्यांमध्ये असलेला बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

  • Share this:

मुंबई, 7 मे : नागरिकत्वाच्या विवादामुळे गेल्या काही दिवसांपासून बातम्यांमध्ये असलेला बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. फानी चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या ओडिशातील पीडितांना अक्षय कुमारनं एक कोटी रुपयांची मदत केली आहे. 'हिदुस्तान टाइम्स'नं दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमारनं ओडिशामध्ये आलेल्या फानी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे.

बॉलिवूडमधील विश्वसनीय सूत्रांकडून 'हिदुस्तान टाइम्स'ला ही माहिती मिळाली आहे. वृत्तपत्रानं याबाबत ओडिशातील मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापपर्यंत यावर कोणतेही उत्तर मिळालेले नाही.

वाचा:कॅनडा माझं घर आहे रिटायर झाल्यावर इथेच स्थायिक होणार, अक्षय कुमारचा 'तो' व्हिडिओ व्हायरल


दरम्यान, अक्षय कुमारनं यापूर्वीही अशी अनेक सामाजिक कार्य केलेली आहेत. केरळ आणि चेन्नईमधील पूरग्रस्त पीडितांनाही आर्थिक मदत केली आहे. तेव्हादेखील अक्षयनं एक कोटी रुपयांची मदत केली होती. अक्षयनं पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांनाही मदतीचा हात दिला होता.

वाचा : होय, माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे पण भारतावरच माझं प्रेम आहे - अक्षय कुमार

शहीद जवानाच्या कुटुंबाला केली 15 लाखांची मदत

अक्षय कुमारनं पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान जीतराम गुर्जर यांच्या कुटुंबाला 15 लाख रुपयांची मदत केली होती. अक्षय कुमारनं हे डोनेशन देशाच्या वीर ट्रस्टला दिलं होतं. यापूर्वीही त्यानं वीर ट्रस्टला 5 कोटी रुपये दिले होते.

VIDEO : मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट, चिमुरड्याची बोटंच तुटली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2019 09:19 AM IST

ताज्या बातम्या