मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'हनिमूनवर त्याने मला...'; पत्नीने हनी सिंगवर केला धक्कादायक आरोप

'हनिमूनवर त्याने मला...'; पत्नीने हनी सिंगवर केला धक्कादायक आरोप

बॉलिवूड गायक आणि रॅपर(Bollywood Singer & Rpper) हृदेश सिंग म्हणजेच यो यो हनी सिंगची(Yo Yo Honey Singh) पत्नी(Wife) शालिनी तलवारने(Shalini Talwar) हनीवर कौटुंबिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत.

बॉलिवूड गायक आणि रॅपर(Bollywood Singer & Rpper) हृदेश सिंग म्हणजेच यो यो हनी सिंगची(Yo Yo Honey Singh) पत्नी(Wife) शालिनी तलवारने(Shalini Talwar) हनीवर कौटुंबिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत.

बॉलिवूड गायक आणि रॅपर(Bollywood Singer & Rpper) हृदेश सिंग म्हणजेच यो यो हनी सिंगची(Yo Yo Honey Singh) पत्नी(Wife) शालिनी तलवारने(Shalini Talwar) हनीवर कौटुंबिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत.

मुंबई, 4 ऑगस्ट- बॉलिवूड गायक आणि रॅपर(Bollywood Singer & Rpper) हृदेश सिंग म्हणजेच यो यो हनी सिंगची(Yo Yo Honey Singh) पत्नी(Wife) शालिनी तलवारने(Shalini Talwar) हनीवर कौटुंबिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. तसेच तिने आपला मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याचासुद्धा आरोप केला आहे. शालिनीनी म्हटलं आहे, की हनीसिंग, त्याचे आईवडील आणि त्याच्या लहान बहिणीने आपलं शोषण केलं आहे. तिने या चौघांविरोधात दिल्लीच्या तीन हजारी कोर्टात याचिका दाखल केली आहे. 160 पानी या याचिकेत शालिनीने 10 वर्षांपूर्वी आपल्या हनिमूनच्या वेळेचा एक किस्सा सांगितला आहे, यामध्ये हनीने आपल्याला मारहाण केल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला आहे.

शालिनीने कोर्टात दिलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, ‘हनी आणि ती शाळेत एकत्र शिकायला होते. त्यावेळीचं त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं होतं. तब्बल 10 वर्षांच्या अफेयरनंतर 14 मार्च 2010 मध्ये या दोघांनी आपल्या कुटुंबांच्या समंतीने साखरपुडा केला होता. त्यांनतर 23 जानेवारी 2011 मध्ये त्यांनी कुटुंबियांच्या उपस्थित लग्नदेखील केलं. हृदेश म्हणजेच हनीसिंगला सुरुवातीपासूनचं म्युझिकवर प्रेम होतं. त्याचं हे म्युझिकवर असणारं प्रेम पाहून शालिनीने प्रत्येकवेळी त्याची साथ दिली’.

हनिमूनवर बदललं रूप-

याचिकेमध्ये पुढे शालिनीने म्हटलं आहे, जेव्हा लग्नानंतर आम्ही मॉरिशसला गेलो. त्यावेळीचं त्याने आपलं नवं रूप दाखवलं होतं. तिथे गेल्यानंतर हनी शांत शांत राहू लागला. त्याच्या वागण्यात खूप बदल झाला होता. हॉटेलमध्ये एकवेळ मी त्याला विचारलं काय झालं आहे. यावर तो रागाने लालबुंद झाला होता.

(हे वाचा:निक घरी येताच प्रियांका चोप्रा झाली भावुक; शेयर केला रोमँटिक PHOTO  )

त्याने म्हटलं,..मला प्रश्न कसं विचारू शकतेस?-

यावेळी हनीने मला खुपचं जोरदार धक्का देत बेडवर ढकललं, आणि किंचाळू लागला, मला म्हटलं तू मला प्रश्न कसं विचारलंस, हनीसिंगला प्रश्न विचारायची हिम्मत कोणाची नाहीय. तर तूसुद्धा मला प्रश्न विचारू नकोस.

अशापद्धतीने हनीच्या पत्नीने म्हणजेच शालिनीने दिल्ली कोर्टात याचिका करत, त्याच्यावर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. त्यामुळे हनी सिंगच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Entertainment