S M L

रणवीर सिंहच्या टि्वटवर ट्रोलधाडकऱ्यांनी तोडले अकलेचे तारे

गमंत अशी की, 'लूजिंग माय रिलिजन' हे एका इंग्रजी गाण्याचे बोल आहेत.

Sachin Salve | Updated On: Nov 11, 2017 07:59 PM IST

रणवीर सिंहच्या टि्वटवर ट्रोलधाडकऱ्यांनी तोडले अकलेचे तारे

11 नोव्हेंबर : सोशल मीडियावर कधी काय घडले याचा नेम नाही.  बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याने 'लूजिंग माय रिलिजन' असं एक टि्वट केलं. पण याचा अर्थ न समजून घेताच ट्रोलधाडकऱ्यांनी पार अकलेचे तारे तोडले. पण यामुळे रणवीरला ट्रोलधाडकऱ्यांचा सामना करावा लागलाय.

रणवीर सिंग सध्या लॉस एंजलिसमध्ये सुट्टीसाठी गेला आहे. त्याच दरम्यान त्याने ट्विटरद्वारे एक फोटो शेअर केला आणि त्यात तो म्हणाला की, 'लूजिंग माय रिलिजन' म्हणजेच मी धर्म सोडतोय.

खरंतर रणवीरने शेअर केलेला ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो आणि त्याने त्यावर लिहलेलं ते वाक्य काही केल्या जुळत नसल्याच म्हणतं त्याच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर चांगलच ट्रोल केलं.


काही जण म्हणतात की, पद्मावती सिनेमाच्या वादामुळे त्याने असं लिहिलं आहे.

गमंत अशी की, 'लूजिंग माय रिलिजन' हे एका इंग्रजी गाण्याचे बोल आहेत. त्यामुळे आता त्याने नेमका काय विचार करुन तो फोटो शेअर केला हे आता तोच स्वत:चं स्पष्ट करेल.

ते काहीही असो पण रणवीरच्या चाहत्यांना त्याच हे ट्विट आवडलं नाही हेच खरं.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2017 07:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close