#SimmbaTrailer-'जब तक रेपिस्ट को पुलिस ठोकती नही, तब तक...'

#SimmbaTrailer-'जब तक रेपिस्ट को पुलिस ठोकती नही, तब तक...'

दीपिका-रणवीरच्या लग्नानंतर रणवीर सिंगचा पहिला 'सिंबा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर लाँच झालेला असून चित्रपटात बलात्कार करणाऱ्या नराधामांना तो शिक्षा देताना दिसणार आहे.

  • Share this:

मुंबई, 3 डिसेंबर : सर्वत्र चर्चेत असलेला सिंबा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग मराठी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी बाजीराव-मस्तानी सिनेमातून रणवीर मराठमोळ्या लुकमध्ये दिसला होता. करण जोहर निर्मित आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंबा सिनेमा पोलिसांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट तेलगु भाषेतील 'टेंपर' सिनेमाचा रिमेक आहे.

सिनेमात सैफ अली खानची मुलगी सारा अली खान अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. सारा अली खान सिनेमात उत्तम मराठी बोलताना दिसणार आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमधील धाडधकट कलाकार सोनू सूड खलनायकाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून सिनेमाची कथा स्पष्टपणे दिसून येत आहे. चित्रपटात रणवीर लाच घेणारा पोलीस दाखवण्यात आला आहे एका घटनेनंतर अचानक त्याच्यात बदल झाल्यानं चित्रपाटात पुढे नेमकं काय घडणार हे ट्विस्ट असणार आहे. विशेष म्हणजे सिनेमात अजय देवगणची झलकसुद्धा पाहायला मिळणार आहे.

आपल्या प्रत्येक चित्रपटात गाड्या उडवणाऱ्या रोहित शेट्टीने यावेळी वेगळ्या अंदाजमध्ये गाड्यांचा वापर केला आहे. सिनेमातील रणवीरची अॅक्शन स्टाईल आणि साराची मराठी डायलॉग डिलिव्हरी पाहायला प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. लग्नानंतर रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा असणार आहे. लग्नातील सर्व फोटोनंतर रणवीरचा पहिला ट्रेलर लुक सिंबा सिनेमातून समोर येत आहे.

येत्या 28 डिसेंबरला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयी उत्सुकता वाढत चालली आहे.

 

Video : दीपवीरच्या रिसेप्शनला शाहरुखनं केला जोरदार डान्स!

First published: December 3, 2018, 2:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading