लग्नानंतर दिपिका म्हणते मला काय काय करावं लागतं, रणवीरनं शेअर केला VIDEO

लग्नानंतर दिपिका म्हणते मला काय काय करावं लागतं, रणवीरनं शेअर केला VIDEO

बॉलीवूड अभिनेत्री दिपिकालासुद्धा काय काय कामं करावी लागतात याचा व्हिडिओ रणवीरनं शेअर केला आहे. पाहा VIDEO

  • Share this:

मुंबई, 12 जानेवारी : लग्नानंतर प्रत्येकाचं आयुष्य बदलतं असं म्हणतात. लग्न झाल्यावर जबाबदारी अंगावर पडली की पोरगं सुधरेल असं म्हणतात. लाडात आई-बापाच्या घरी वाढलेली मुलगी सासरी गेल्यावर जबाबदारीनं काम करेल अशी समजूत आहे. आता नुकतंच लग्न झालेल्या बॉलीवूड अभिनेत्री दिपिकालासुद्धा काय काय कामं करावी लागतात याचा व्हिडिओ रणवीरनं शेअर केला आहे.

रणवीर सिंगनं इन्स्टाग्रामवर 11 जानेवारीला दिपिकाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात दिपिका एकदम बिनधास्तपणे दंगा-मस्ती करताना दिसत आहे. यात ती 'ए आया पुलीस' असंही म्हणते.  रणवीरनं या व्हिडिओला 'मेरी चीयर लीडर' असा कॅप्शन दिला आहे.

 

View this post on Instagram

 

My Cheerleader ❤️ @deepikapadukone

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट आल्या आहेत. दिपिकानेही यावर कमेंट केली आहे. तिनं म्हटलं की, तुझं मनोरंजन करण्यासाठी मला काय काय करावं लागतं.

लग्नानंतर रणवीर-दिपिका जास्तच चर्चेत आहेत. आता ते दोघेही भारताचा माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. यात कपिल देव यांची भूमिका रणवीर तर त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिपिका असणार आहे.

First published: January 12, 2019, 3:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading