VIDEO :रणवीर-साराच्या नव्या गाण्याची एकच धूम

VIDEO :रणवीर-साराच्या नव्या गाण्याची एकच धूम

रणवीरच्या सिंबाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.काही दिवसांपूर्वी सिनेमाचं ट्रेलर रिलीज झालं. आता नवं गाणं युट्युबवर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतंय.

  • Share this:

मुंबई, 6 डिसेंबर : दीपवीरचं लग्न आणि इतर सोहळे झाले. आता रणवीरच्या सिंबाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.काही दिवसांपूर्वी सिनेमाचं ट्रेलर रिलीज झालं. आता नवं गाणं युट्युबवर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतंय.

केदारनाथनंतर सारा अली खानचा सिंबा लगेच रिलीज होतोय.  रणवीरसोबतच्या तिच्या या गाण्याचे व्ह्यूजही वाढतायत.

3 मिनिटं 22 सेंकदाचं आँख मारे हे गाणं अर्शद वारसीच्या तेरे मेरे सपने या सिनेमातल्या गाण्याचा रिमेक आहे. यात करण जोहरही दिसतोय. श्रेयस तळपदे, अर्शद वारसीही या सिनेमात आहेत.

सिंबा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग मराठी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी बाजीराव-मस्तानी सिनेमातून रणवीर मराठमोळ्या लुकमध्ये दिसला होता. करण जोहर निर्मित आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंबा सिनेमा पोलिसांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट तेलगु भाषेतील 'टेंपर' सिनेमाचा रिमेक आहे.

सिनेमात सैफ अली खानची मुलगी सारा अली खान अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. सारा अली खान सिनेमात उत्तम मराठी बोलताना दिसणार आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमधील धाडधकट कलाकार सोनू सूड खलनायकाची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून सिनेमाची कथा स्पष्टपणे दिसून येत आहे. चित्रपटात रणवीर लाच घेणारा पोलीस दाखवण्यात आला आहे एका घटनेनंतर अचानक त्याच्यात बदल झाल्यानं चित्रपाटात पुढे नेमकं काय घडणार हे ट्विस्ट असणार आहे. विशेष म्हणजे सिनेमात अजय देवगणची झलकसुद्धा पाहायला मिळणार आहे.

आपल्या प्रत्येक चित्रपटात गाड्या उडवणाऱ्या रोहित शेट्टीने यावेळी वेगळ्या अंदाजमध्ये गाड्यांचा वापर केला आहे. सिनेमातील रणवीरची अॅक्शन स्टाईल आणि साराची मराठी डायलॉग डिलिव्हरी पाहायला प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. लग्नानंतर रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा असणार आहे. लग्नातील सर्व फोटोनंतर रणवीरचा पहिला ट्रेलर लुक सिंबा सिनेमातून समोर येत आहे.

मलायकाच्या नव्या बुटांचा फोटो व्हायरल, किंमत ऐकलीत तर व्हाल थक्क

First published: December 6, 2018, 5:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading