VIDEO: पाकिस्तानशी दोन हात करताना सिंबासोबत थिरकले गावस्कर, म्हणाले- ‘जरा पास आओ तो चैन आ जाए’

VIDEO: पाकिस्तानशी दोन हात करताना सिंबासोबत थिरकले गावस्कर, म्हणाले- ‘जरा पास आओ तो चैन आ जाए’

या व्हिडिओत काही लोक रणवीरच्या एनर्जीचं कौतुक करत आहेत. तर काहींना सुनील यांचा डान्स आवडला.

  • Share this:

मॅन्चेस्टर, 17 जून- असं काय आहे जे बॉलिवूड अभिनेता करू शकत नाही असा प्रश्न सध्या त्याच्या चाहत्यांना पडला आहे. रणवीर सध्या क्रिकेट कॉमेंट्रीमध्ये आपला हात आजमावत आहे. आता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात रणवीर माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. हे दोघं 'बदन पे सिताने लपेटे' गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. विशेष म्हणजे भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर हा व्हिडिओ जास्त पसंत केला जात आहे.

रणवीर आणि गावस्कर यांचा हा डान्स व्हिडिओ हरभजन सिंगने त्याच्या ट्वीटर अकाउंटवरून शेअर केला. या व्हिडिओत काही लोक रणवीरच्या एनर्जीचं कौतुक करत आहेत. तर काहींना सुनील यांचा डान्स आवडला. हा व्हिडिओ शेअर करताना हरभजनने लिहिले की, ‘सामन्या दरम्यान जेव्हा सनी पाजी नाचतात.. वा काय सुंदर दृश्य होतं...’

हेही वाचा- VIDEO: मैदानात रणवीरने विराटला मारली मिठी, दिल्या विजयाच्या अनोख्या शुभेच्छा

हेही वाचा- भारताने पाकिस्तानला हरवलं, खूश होतं सलमान खानने केलं हे ट्वीट

टीम इंडियाने पाकिस्तानला सलग सातवेळी वर्ल्ड कपमध्ये हरवले आहे. १६ जूनला झालेल्या सामन्यात भारताने  पाकिस्तानला ८९ धावांनी हरवले. पावसामुळे सामना थांबवण्यात आल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने ८९ धावांनी पाकिस्तानला हरवले. रोहित शर्माच्या शतकी खेळीने आणि कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळामुळे भारताने पाकिस्तानसमोर ३३६ धावांचं लक्ष ठेवलं होतं. भारत आणि पाकिस्तान हे सर्वातआधी १९९२ मध्ये पहिल्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. यानंतर सलग सातवेळा हे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आले आहेत. पण आतापर्यंत एकदाही पाकिस्तानला भारताला वर्ल्डकपमध्ये हरवता आले नाही.

रोहित शर्मा ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2019 03:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading