मुंबई, 22 फेब्रुवारी : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे दोघेही ब्रम्हास्त्र या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाची आणखी प्रतिक्षा प्रेक्षकांना कारावी लागणार आहे. 4 डिसेंबर 2020ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटाबद्दल नवी माहिती समोर आली आहे. आता या चित्रपटासाठी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनाही विचारण्यात आलं होतं. खरंतर दिग्दर्शक अयान मुखर्जींची या चित्रपटात दीपिका आणि रणवीरला रणबीर कपूरचे आई-वडिल बनवण्याची इच्छा होती.
पिंकविलाच्या वृत्तानुसार, दिग्दर्शकाला या चित्रपटात रणवीर सिंग आणि दीपिकालाही घेण्याची इच्छा होती. हा चित्रपट 3 भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या भागात चित्रपटातील काही पात्र ही लहान दाखवण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात ही पात्र महत्वाची भूमिका बजावताना दिसतील. त्यामुळे दिग्दर्शकाला तरुण पिढीचे असे 2 पात्र हवे होते जे रणबीर कपूर साकारत असलेल्या शिव या पात्राच्या आई-वडिलांची भूमिका करतील.
पहिल्य़ा भागात दीपिका आणि रणवीरची छोटी एन्ट्री होती. त्यानंतर दुसऱ्या भागात त्यांच्या पात्रांची खऱ्या अर्थाने ओळख होणार होती मात्र मिळालेल्या माहितीनुसार दिपिका रणवीर दोघांनीही या भूमिकेसाठी नकार दिला आहे. त्यामुळे दिग्दर्शक आता या भूमिकेसाठी इतर कलाकारांचा शोध घेत आहे.
It's final! Brahmāstra releases on 4th December, 2020 in Hindi, Tamil, Telugu, Malayalam and Kannada! #Brahmastra@SrBachchan #RanbirKapoor @aliaa08 @iamnagarjuna @RoyMouni #AyanMukerji @ipritamofficial @apoorvamehta18 #NamitMalhotra @MARIJKEdeSOUZA pic.twitter.com/lJo60VxRvf
— Karan Johar (@karanjohar) February 2, 2020
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच एकत्र काम कऱत आहेत. आणि याच चित्रपटाच्या शूटींगदरम्यान आलिय आणि रणबीर जवळ आले आहेत. या चित्रपटात ऱणबीर, आलिया यांच्याव्यतिरिक्त अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय देखिल दिसणार आहेत. तसचं शाहरुख खान, डिंपल कपाडिया आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन सुद्धा दिसणार आहे.