News18 Lokmat

दीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक

लग्नाचा एक तरी फोटो समोर यावा यासाठी फॅन्स आतुरलेत. तसे दूरवरचे फोटो व्हायरल झालेत. पण आम्हाला त्याचा शेरवानीचा फोटो मिळालाय. आज 6 वाजता दोघं मोठी घोषणा करू शकतात.

News18 Lokmat | Updated On: Nov 15, 2018 10:15 AM IST

दीपवीर : लग्नातला पहिला फोटो झाला लीक

मुंबई, 15 नोव्हेंबर : रणवीर सिंग-दीपिका यांचं लग्न झालं. सहा वर्षांच्या डेटिंगनंतर सरतेशेवटी दोघांनी दोनाचे चार हात केले. दीपिकाचं काल ( 14 नोव्हेंबर ) कोकणी पद्धतीनं लग्न झालं. तर रणवीर सिंग सिंधी असल्यानं आज ( 15 नोव्हेंबर )ला सिंधी पद्धतीनं लग्न झालं.


लग्नाचा एक तरी फोटो समोर यावा यासाठी फॅन्स आतुरलेत. तसे दूरवरचे फोटो व्हायरल झालेत. पण आम्हाला मिळालाय रणवीरचा अगदी जवळचा फोटो. शेरवानी घातलेल्या रणवीरचा अगदी जवळचा फोटो आम्हाला मिळालाय. लग्नात शाहरुख खान, फराह, संजय लीला भन्साळी यांनीही लग्नात खूप धमाल केलीय.


संगीत सोहळ्यात रणवीर आणि दीपिकानं जोरदार डान्स केलाय. आता सगळे वाट पाहतायत ते  या डान्स व्हिडिओची. तो अजून बाहेर आलेला नाही. यावेळी कुटुंबातले लोक, मित्रमंडळी यांनी अक्षरश: जल्लोष केल्याची माहितीही समोर आलीय.

Loading...


डिनर झाल्यानंतर सगळ्यांनी तुफान डान्स केला. रणवीरचे वडील जास्त खूश दिसत होते. रणवीर काळ्या सुटमध्ये होता. बाॅलिवूडची ही हाॅट जोडी खूप खूश दिसत होती.


कृपया पुष्पगुच्छ वा आहेर आणू नयेत ही विनंती.. हा मजकूर तुम्ही लग्नाच्या पत्रिकेवर पाहिला असेल.असंच काहीसं म्हणत आहेत बॉलिवूडची लग्नाळू जोडी रणवीर -दीपिका. लग्नाला भेटवस्तू न स्वीकारता ही भेट डोनेशनच्या रूपात 'लिव्ह लव्ह लाफ' या दीपिका पदुकोणच्या फाऊंडेशनला द्यावी अशी विनंती दीपिका-रणवीर यांनी लग्नपत्रिकेवर केली आहे.


लिव्ह लव्ह लाफ हे नॉन प्रॉफिटेबल चॅरिटी फाऊंडेशन नैराश्याने त्रस्त असलेल्या रूग्णांसाठी काम करतं.  महागड्या भेटवस्तू न देता ही अनोखी मदत त्यांना मिळावी हा एक  प्रयोग या जोडीने केलाय.लग्न करणाऱ्या अनेकांसाठी हा नवा आदर्श नक्कीच ठरेल.


PHOTOS: मीडियापासून पळण्यासाठी दीपिका आणि रणवीर कुठे लपलेत पाहा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 15, 2018 10:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...