मुंबई, 26 नोव्हेंबर : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर संकटात सापडलीय. रिद्धिमानं नवी ज्वेलरी लाँच केलीय. यात मोती आणि हिरे असलेले इयररिंग्ज आहेत. खूप सुंदर दिसणाऱ्या या दागिन्याचं डिझाइन चोरी केल्याचा आरोप रिद्धिमावर लावलाय.
डाइट सब्या नावाच्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवरून दोन फोटोज शेअर केलेत. त्यांचा असा दावा आहे की हे डाझाइन कोकीची मिकीमोटो यांचं आहे. रिद्धिमानं डिझाइनच नाही तर फोटोही चोरलाय.
कोकीची मिकीमोटो पर्ल किंग नावानं ओळखले जातात. 1916पासून ज्वेलरी डिझाइनिंगमध्ये त्यांचं नाव आहे.
या पोस्टनंतर युझर्सनी रिद्धिमावर खूप टीका केली. रिद्धिमाची बाजू अजून कळलेली नाही. पण रिद्धिमा बरीच वर्ष डिझायनिंग करतेय. घरात सगळे अभिनते, अभिनेत्री असताना रिद्धिमानं आपली वेगळी वाट निवडलीय.
Photos : संभाजी महाराजांच्या भेटीला सेवाव्रती