News18 Lokmat

आलियासाठी फोटोग्राफर बनला रणवीर, व्हायरल झाले सुंदर क्षण

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालंय. शूटच्या वेळी दोघांची मैत्री गहिरी झाली.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2018 02:43 PM IST

आलियासाठी फोटोग्राफर बनला रणवीर, व्हायरल झाले सुंदर क्षण

मुंबई, 26 जुलै : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालंय. शूटच्या वेळी दोघांची मैत्री गहिरी झाली. त्यांच्या रिलेशनशिपची चर्चाही सुरू झालीय. आता तर आलियानं इन्स्ट्राग्रामवर एक फोटो टाकलाय. आणि त्या फोटोखाली क्रेडिट दिलंय रणवीरला. आलियासोबत तिची मैत्रीण आकांक्षाही आहे. दोघांचा पाठमोरा फोटो आहे. या फोटोचं क्रेडिटवरचं नाव पाहून लगेच फोटो व्हायरल झालाय.

the view and her too.. 📸photo credit - RK

Loading...

A post shared by Alia ✨⭐️ (@aliaabhatt) on

हा फोटो बुल्गारिया इथे काढलाय. सात लाखाच्या वर त्याला लाईक्सही मिळाल्यात. सिनेमाचं शेड्युल संपलं तरीही दोघं अजून एकत्र असतात. म्हणजेच डाल मे कुछ काला है. दोघांमध्ये कंफर्ट लेव्हलही चांगली आहे.

मध्यंतरी, ऋषी कपूरनं मिडडे या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच आपलं तोंड उघडलं.  ते म्हणाले, ' जे काही आहे ते सगळ्यांनाच ठाऊक आहे. खरं तर रणबीर आता 35शीत आहे. मी 25 वर्षांचा असताना माझं लग्न झालं होतं. रणबीरनं तर आता ताबडतोब लग्न करावं. म्हणजे आम्हाला नातवंडांशी खेळता येईल. '

महेश भट्ट यांच्याकडूनही या नात्यासाठी हिरवा कंदिल आहे. सिनेपत्रकार राजीव मसंद यांच्यासोबतच्या गप्पांमध्ये रणबीर म्हणाला, "आलियाचा माझ्या जीवनावर बराच सकारात्मक प्रभाव राहिला आहे. तिची अभिनेत्री म्हणून खूप स्तुती करतो. ती खूप मेहनत करते आणि खूप शिस्तीने काम करते."

प्रेमाविषयी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना रणबीर म्हणाला की, जेव्हा व्यक्ती प्रेमात असतो तेव्हा तो काही अद्भूत काम करतो. प्रेमात असणं ही स्वत:मधेच एक सुंदर गोष्ट आहे.

आपल्या आणि आलियाविषयी बोलताना रणबीरने हा खुलासाही केला की, आम्ही दोघेही प्राणीप्रेमी आहेत. बऱ्याचदा या दोघांना आपापल्या पाळीव प्राण्यांसोबत फोटो शेयर करताना पाहिलं गेलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2018 02:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...