मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रणबीर कपूर-आलिया भट्ट RK स्टुडिओत नाही तर इथे करणार विवाह सोहळा! कोणत्या तारखांना होणार लग्नविधी?

रणबीर कपूर-आलिया भट्ट RK स्टुडिओत नाही तर इथे करणार विवाह सोहळा! कोणत्या तारखांना होणार लग्नविधी?

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर (Alia Bhatt-Ranbir Kapoor Wedding latest update) हे सध्याच्या बॉलिवूड कपल्सपैकी सर्वाधिक चर्चेत असणारं कपल आहे. कारण सध्या या दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 08 एप्रिल: अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर (Alia Bhatt-Ranbir Kapoor Wedding latest update) हे सध्याच्या बॉलिवूड कपल्सपैकी सर्वाधिक चर्चेत असणारं कपल आहे. कारण सध्या या दोघांच्या लग्नाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. लवकरच आलिया-रणबीर लग्नाच्या बेडीत अडकू (Ranbir Kapoor-Alia Bhatt wedding) शकतात. पुढील आठवड्यातच भट्ट-कपूर कुटुंबीयांच्या घरी सनई-चौघडे वाजण्याची शक्यता आहे.

दरम्यान लग्नाच्या ठिकाणाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. आता अशी बातमी मिळते आहे की, रणबीर कपूरने 8 दिवसांसाठी 'वास्तू बिल्डिंग'चा बँक्वेट बुक केला आहे. यापूर्वी असे वृत्त समोर आले होते की, रणबीर-आलिया (Ranbir-Alia Wedding Venue) आरके स्टुडिओमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

हे वाचा-PRIYA BAPAT चा स्पेशल डेनिम लुक, BACKLESS फोटो पोस्ट करत दिल्या BOLD पोज

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्नानंतर एका घरात राहणार आहेत, पण तुम्हाला माहित आहे का की हे दोघेही सध्या एकाच इमारतीत राहतात. दरम्यान त्यांच्या लग्नाचे बहुतांश (Indian Wedding Rituals) विधी याठिकाणीच पार पडणार आहेत. त्यामुळे हे ग्रँड वेडिंग चेंबूरच्या आरके स्टुडिओत नसून पाली हिल याठिकाणी असणाऱ्या 'वास्तू'मध्ये होणार असल्याची शक्यता अधिक आहे.

टाइम्स ऑफ इंडियामधील अहवालानुसार सूत्रांच्या हवाल्याने अशी माहिती देण्यात आली आहे की, रणबीर कपूर त्यांच्या लग्नासाठी बिल्डिंग तसंच समोरील रस्त्यावर काही सजावट करणार आहे. पण त्यासाठी त्याला प्रथम पाली हिल रेसिडेंट्स असोसिएशनशी (PHRA) संपर्क करुन परवानगी मिळवावी लागेल.

हे वाचा-विदेशात Priyanka Chopra चा देसी तडका, शेअर केला ट्रॅडिशनल LOOK

'वास्तू'मध्ये होणार मेहंदी, हळद आणि संगीतचे कार्यक्रम

लग्नाविषयी समोर आलेल्या अपडेटनुसार, 13 तारखेला मेहंदी आणि 14 एप्रिलला हळद आणि संगीतचा कार्यक्रम असून तो 'वास्तू'मध्ये असेल. रणबीर कपूर वांद्रे याठिकाणाी असणाऱ्या या 'वास्तू अपार्टमेंट'मध्ये सातव्या मजल्यावर राहतो, तर आलिया भट्ट याठिकाणी पाचव्या मजल्यावर राहते. हे अपार्टमेंट 2460 स्क्वेअर फूट आहे. हा फ्लॅट मुंबईतील एका पॉश एरिआत आहे. हा 12 मजली कॉम्प्लेक्स कपूर कुटुंबाच्या कृष्णा राज बंगल्याजवळ आहे. दोघांच्या लग्नाबाबत आधी बातमी होती की ते 14 एप्रिलला लग्नबंधनात अडकणार होते, त्यानंतर असे अपडेट समोर आले की रणबीर-आलिया 17 एप्रिलला लग्न करतील. पण लेटेस्ट अपडेटनुसार रणबीर आणि आलिया 15 एप्रिल रोजी पंजाबी पद्धतीनुसार लग्न करणार आहेत आणि त्यानंतर 16 एप्रिलच्या पहाटे ते 7 फेरे घेतील.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Ranbir kapoor, Wedding