कमकूवत हृदयाचे लोक हे 5 सिनेमे, मिनिटभरही पाहू शकणार नाहीत

रामसे ब्रदर्स त्याकाळी भयपटांची निर्मिती करायचे. त्यांचे सिनेमे एवढे भितीदायक असायचे की अनेक प्रेक्षक चित्रपटगृहातच बेशुद्ध व्हायचे.

  • Share this:

बॉलिवूडमध्ये प्रत्येक पठडीतले सिनेमे तुम्हाला पाहायला मिळतील. अॅक्शनपटांपासून ते रोमँटिक आणि विनोदीपटांपर्यंत सिनेमे पाहण्याचे अनेक पर्याय तुमच्याकडे आहेत. पण फार कमी प्रमाणात ज्या सिनेमांची बॉलिवूडमध्ये निर्मिती होते ते म्हणजे भयपट.

अनेकदा भयपटांना प्रेक्षकांना घाबरवण्यात यश मिळते तर काही सिनेमे दणकून आदळतात. मात्र एकेकाळी भयपटांच्या निर्मितीमध्ये एक नाव सर्वात प्रसिद्ध होतं ते म्हणजे रामसे ब्रदर्स.

रामसे ब्रदर्स त्याकाळी भयपटांची निर्मिती करायचे. त्यांचे सिनेमे एवढे भितीदायक असायचे की अनेक प्रेक्षक चित्रपटगृहातच बेशुद्ध व्हायचे. आज आम्ही तुम्हाला त्याच्या काही सिनेमांबद्दल सांगणार आहोत.

विराना- या सिनेमात सुंदर मुलगी लहानपणापासून प्रेताच्या ताब्यात असते. पुरुषांना ती एकांतात बोलावते आणि जेव्हा ते तिच्या जाळ्यात अडकतात तेव्हा ती मुलगी तिचा खरा चेहरा दाखवून त्यांना मारून टाकते.

पुराना मंदिर- २०० वर्षांपूर्वी एका राजाला कपटी तांत्रिक शाप देतो की त्याच्या घरी प्रत्येक मुलगी बाळाला जन्म देताना मरेल. याच काळात तो तांत्रिक स्वतः भूत होऊन जीवंत होतो आणि त्याच्या घरातील व्यक्तींना मारून टाकतो.

पुरानी हवेली- एका श्रीमंत कुटुंब अचानक लांब बांधलेल्या बंगल्यात रहायला जातात. तिथे राहत असताना त्यांना जाणवतं की, त्या घरात अनेक अयोग्य घटना घडत असतात. मग सुरू होतो भूत आणि प्रेतांचा खेळ.

गेस्ट हाऊस- सिनेमात एक पुरूष महिलेवरील भुतबाधा घालवण्यासाठी तिला एका निर्मनुष्य गेस्ट हाऊसमध्ये भेटायला जातो. त्याच्या हातात एक महागडी अंगठी असते. याच गेस्ट हाऊसमध्ये त्याची हत्या होते आणि ती अंगठी लुटून नेली जाते. मग तो माणूस सूड घेण्यासाठी भूत होतो.

डाक बंगला- बंगल्यासाठी एक माणूस आपल्या कुटुंबासह केअर टेकर म्हणून पोहोचतो. इथे गेल्यावर त्याला कळतं की काही गुंड घरात घुसले आहेत आणि त्यांनी तिथे असलेल्या एका ‘ममी’ला जागं केलं. यामुळे त्या ‘ममी’मधली आत्मा जागी होते आणि मग सुरू होतो मृत्यूतांडव.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2019 05:58 PM IST

ताज्या बातम्या