भारती सिंगच्या लग्नात राखी आणि मलिष्काचा 'असा' जलवा

भारती सिंगच्या लग्नात राखी आणि मलिष्काचा 'असा' जलवा

राखीने तिच्या ढिंच्याक स्टाईलमध्ये अगदी जमिनीवर बसून नागिन डान्स केलाय. त्याचबरोबर एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये राखीसोबत आरजे मलिष्कानेही ताल धरला आहे.

  • Share this:

4 डिसेंबर : कॉमेडी क्विन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया हे दोघे काल 3 डिसेंबरला लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. त्यांच्या या लग्नसोहळ्यात बॉलिवूडच्या अनेक मंडळींनी हजेरी लावली होती.

या लग्नसोहळ्यातले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. त्यातला एक व्हिडिओ गाजतोय तो राखी सावंतच्या नागिन डान्सचा!

तिने ढोलाच्या तालावर ठूमका मारत नागिन डान्स केला आहे. तिच्या या मजेशीर डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच गाजतोय.

यातल्या एका व्हिडिओमध्ये राखी सावंत नागिन डान्स करताना दिसतेय. ढोल-नगाड्याच्या तालावर राखी चांगलीच थिरकताना दिसते आहे. राखीने तिच्या ढिंच्याक स्टाईलमध्ये अगदी जमिनीवर बसून नागिन डान्स केलाय.

त्याचबरोबर एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये राखीसोबत आरजे मलिष्कानेही ताल धरला आहे. राखी आणि मलिष्काच्या या डान्स व्हिडिओला सोशल मीडियावरही चांगलीच पसंती मिळते आहे.

या व्हिडिओमध्ये नवरी मुलगी मात्र सगळ्यांसोबत फोटो काढताना दिसते आहे. त्यामुळे भारतीच्या लग्नात सगळ्यांनीच धमाल केली असं म्हणायला हरकत नाही.

First published: December 4, 2017, 11:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading