राखी सावंतनं शेअर केला पतीच्या घरचा VIDEO, लोक म्हणतात फेकू नकोस!

राखी सावंतनं शेअर केला पतीच्या घरचा VIDEO, लोक म्हणतात फेकू नकोस!

  • Share this:

मुंबई 26 ऑक्टोंबर : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत कायम चर्चेत असते. चर्चेत राहण्यासाठी ती सतत काही ना काही अशा गोष्टी करत असते की त्याची कायम चर्चा होते. राखीच्या लग्नामुळे ती गेले अनेक दिवस चर्चेत आहे. मात्र आतापर्यंत तिच्या नवऱ्याचा फोटो किंवा व्हिडीओसुद्धा अजुन बाहेर आलेला नाही. असं असताना राखीने शुक्रवारी Instagramवर नवऱ्याच्या घरातला एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यावर लोकांनी कमेंट्स करत राखीला टोले लगावलेत. हा TikTok व्हिडीओ आहे, फेकण्याचीही काही लिमिट असते उगाच फेकू नकोस असंही लोकांनी तीला सुनावलं.राखी सावंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तिच्या व्हिडीओत एक अलिशान घर दिसतंय. त्यात जोड्यांची एक मोठी रॅक असून मोठा अलिशान बेडही दिसतोय. त्या रुमला काचेची मोठी वॉल असून त्यातून बाहेरचं दृष्यही दिसतंय. बेडच्या बाजूलाच व्यायाम करण्याच्या काही वस्तूही ठेवण्यात आल्याचं दिसंतय.

राखी लिहितेय, हे माझं खर, मी माझ्या नवऱ्याच्या ह्रदयातली आणि घरातली राणी आहे. राखीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स करून तीची फिरकी घेतली. तर काहींनी तीला सुनावण्यासही कमी केलं नाही. हे तुझं घर नाही तर हॉटेलची रुम आहे असंही लोकांनी तीला सुनावलंय. स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार राखी सावंतचा पती रितेशने सांगितलंय की तो जाणीवपूर्वक कॅमेऱ्यासमोर येत नाहीय. मला माझं खासगीपण जपायचं आहे असंही त्याने सांगितलं. राखी प्रेग्नंट आहे या वृत्ताचाही त्याने इन्कार केलाय, राखी  प्रेग्नंट नाही असं त्याने सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 12:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading