'बधाई दो' साठी राजकुमार रावचं जबरदस्त वर्कआउट, शर्टलेस PHOTO VIRAL

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. आतापर्यंत त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले असून लवकरच तो नवीन चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. आतापर्यंत त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले असून लवकरच तो नवीन चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • Share this:
    मुंबई, 16 डिसेंबर: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. आतापर्यंत त्याने अनेक सुपरहिट आणि हिट चित्रपट दिले असून लवकरच तो नवीन चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बधाई दो' (Badhaai Do) या नवीन सिनेमात तो दिसून येणार असून यासाठी तो मोठ्या प्रमाणात मेहनत देखील घेत आहे. राजकुमार राव या चित्रपटासाठी पिळदार शरीरयष्टी कमावत असून त्याने एक फोटो देखील इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो शर्टलेस दिसून येत असून यामध्ये त्याची उत्तम शरीरयष्टी दिसून येत आहे. यासंदर्भात त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट करताना #WorkInProgress #NEWतन #BadhaiDo असे हॅश टॅग वापरले आहेत. 'नवीन भूमिकेसाठी नवीन लुक मिळवताना नवीन शरीर आणि नवीन विचारसरणी मिळवण्याची गरज असते' असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.
    त्याच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या असून त्याच्या मेहनतीचं कौतुक केलं आहे. अनेकांनी त्याच्या या फोटोवर फायर इमोजीची कमेंट केली आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमधील कास्टिंग डायरेक्टर आणि निर्माता मुकेश छाब्रा यांनी देखील त्याच्या पोस्टवर कमेंट करत ‘शाब्बास माझ्या वाघा,’ असं म्हटलं आहे. (हे वाचा-"टू मच डेमोक्रॉसी" उर्मिला मातोंडकर यांची मोदी सरकारवर तिखट शब्दात टीका) 'बधाई हो' हा सिनेमा विशेष गाजला होता. या सिनेमात आयुष्मान खुरानाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या नीना गुप्ता प्रेग्नंट दाखवण्यात आल्या होत्या यामुळे कुटुंबाला झालेला त्रास आणि बाहेरील व्यक्तींचे टोमणे खूपच मजेशीर पद्धतीने मांडले होते. अतिशय गंभीर विषयाला कॉमेडीच्या रूपात दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला होता. या सिनेंमाला प्रेक्षकांनी भरभरून पाठिंबा देखील दिला होता. (हे वाचा-नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्या अभिनेत्याच्या क्राईम ब्राँचने आवळल्या मुसक्या) दरम्यान, राजकुमार राव ‘बधाई दो’ बरोबरच प्रियांका चोप्रा हिच्याबरोबर ‘द व्हाइट टायगर’ या सिनेमात देखील दिसणार आहे. 'बधाई दो'  हा चित्रपट आयुष्मान खुराना आणि सान्या मल्होत्रा यांच्या ‘बधाई हो’ या चित्रपटाचा सिक्वेल असून यामध्ये राजकुमार रावबरोबर भूमी पेडणेकर दिसणार आहे. या दोघांमधील केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हर्षवर्धन कुलकर्णी या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून यामध्ये इतर कलाकार कोण आहेत याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना लागली आहे. बधाई हो या सिनेमाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले होते. त्यामुळे बधाई दो याला देखील अशाच पद्धतीने यश मिळण्याची अपेक्षा राजकुमार राव याला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: