...म्हणून राजकुमार राव अभिनयात आहे परफेक्ट

...म्हणून राजकुमार राव अभिनयात आहे परफेक्ट

अभिनेता राजकुमार रावने बॉलिवूडच्या परफेक्शनिस्ट आमिर खानकडून अभिनयाचे धडे घेतले असल्याची कबुली त्याने एका मुलाखतीमध्ये दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 27 डिसेंबर : राजकुमार राव हा सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेला अभिनेता आहे. त्याच्या अभिनयाचे गोडवे सगळईकडे गायले जातात. नुकरताच त्याने दिलेल्या मुलाखतीमधून एक खुलासा केला आहे. राजकुमार रावने बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानकडून अभिनय शिकला आहे. राजकुमारने आमिर खानसोबत तलाश चित्रपटात एकत्र काम केलं आहे. चित्रपटात आमिर खान पोलिसाच्या भूमिकेत होता आणि राजकुमार राव त्याचा जुनिअर पोलिस सहऱ्याच्या भूमिकेत होता.

मुलाखतीमध्ये राज कुमारने सांगितलं की, एकत्र काम करत असल्यामुळे आणि त्यांच्या बोलण्यातून आमिरला अभिनयाचे धडे मिळाले आहेत. राजकुमारने आमिरला खूपकाही विचारलं आणि त्याला विचारलं की तुम्ही एखाद्या रोलसाठी कशाप्रकारे मेहनत घेतो?

राजकुमार रावने सांगितलं की आमिर खान फारच छान माणूस आहे. सिनेमांच्या सेटवर शूटिंगदरम्यान कलाकार एकमेकांशी बोलण्यापासून पळत असतात. पण आमिर खानने छान गप्पा मारत त्याने रोलविषयीचा अभ्यास सांगितला. 3 तासाच्या गप्पांमध्ये आमिरने राजकुमारचा क्लास घेतला होता.

राजकुमार रावने आणिरसोबत तलाश चित्रपटात काम केलं आहे. तलाश चित्रपट 2012 मध्ये रिलीज झाला होता. यानंतर राजकुमारला आमिरसोबत काम करायची संधी मिळाली नाही.

सध्या ठग्स ऑफ हिंदोस्तानमुळे आमिर खान बराच चर्चेत राहिला होता. त्याच्या एका चित्रपटाच्या अपयशामुळे त्याला प्रचंड ट्रोल केलं जात होतं. पण बॉलिवूडमध्ये दमदार सिनेमे केलेला हा कलाकार नेहमीच परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणार हे मात्र निश्चित आहे.

राजकुमार राव सध्या स्त्री, फन्ने खान यांसारख्या सिनेमांमुळे चर्चेत होता. पण आता इक लडकी को देखा तो ऐसा लगा चित्रपटात तो झळकणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

First published: December 27, 2018, 9:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading