मुंबई, 20 नोव्हेंबर: भारतासारख्या देशात प्रत्येक दिवशी एखादा चित्रपट तरी प्रदर्शित होत असतो. चित्रपट हिट-फ्लॉप होणे ही नित्यनियमाची बाब आहे. एखादा चित्रपट यशस्वी होते तेव्हा पहिले श्रेय अभिनेता आणि अभिनेत्रीला दिले जाते. पण चित्रपटाच्या यशाचे खरे मास्टरमाईंड हे पडद्यामागे असतात. अशाच एका बॉलिवूडमधील मास्टरमाईंडचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूड (Bollywood) मधील या चित्रपट दिग्दर्शकाने गेल्या 16 वर्षात एकही फ्लॉप चित्रपट दिलेला नाही. इतक नव्हे तर या दिग्दर्शकाने केलेले सर्व चित्रपट सुपरहिट नव्हे तर ब्लॉकबस्टर ठरले आहेत.
मुन्ना भाई MBBS,'लगे रहो मुन्ना भाई', '3 इडियट्स', आणि 'पीके' अशा एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani)यांचा आज 57वा वाढदिवस आहे. हिरानी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा गोष्टी ज्या अन्य कोणत्याही दिग्दर्शकात सापडणार नाही. राजकुमार बॉलिवडूमधील अशा मोजक्या दिग्दर्शकांपैकी आहेत ज्यांनी एकही फ्लॉप चित्रपट दिला नाही. तुम्हालाही वाचून अश्चर्य वाटेल की राजकुमार यांनी गेल्या 16 वर्षात फक्त 5 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. केवळ 5 चित्रपटांच्या यशावर राजकुमार हे हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहेत.
राजकुमार यांनी दिग्दर्शिक केलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांनी असे काही डोक्यावर घेतले की त्यांच्या सर्व चित्रपटांनी तिकिटबारीवर मोठी कमाई केली. अर्थात राजकुमार यांनी केवळ सुपरहिट चित्रपट दिले नाहीत. तर अनेक अभिनेते आणि अभिनेत्यांचे करिअर वेगळ्या उंचीवर पोहोचवले. दिग्दर्शक म्हणून राजकुमार यांचा पहिला चित्रपट 2033मध्ये आला होता. मुन्ना भाई MBBS या चित्रपटाने संजय दत्तचे थांबलेले करिअर सुरु झाले. त्यानंतर 2006मध्ये 'लगे रहो मुन्ना भाई', 2009मध्ये प्रदर्शित झालेला '3 इडियट्स', 2014मधील 'पीके' आणि 2018मधील संजू चित्रपटाने जोरदार कमाई केली. या चित्रपटांनी फक्त कमाई केली नाही तर आमिर खान, रणबीर कपूर या अभिनेत्यांचे करिअर वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.