सुपरस्टार रजनीचा 'काला' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात !

सुपरस्टार रजनीचा 'काला' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात !

'काला' सिनेमात सुपरस्टार रजनीकांत सोबत अभिनेते नाना पाटेकर आणि आणि अभिनेत्री हुमा कुरेशी अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे.

  • Share this:

5 जून : सुपरस्टार रजनीकांतचा बहुचर्चित सिनेमा 'काला' प्रदर्शनापूर्वीच आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या आठवड्यात 6 जून रोजी प्रदर्शीत होणाऱ्या काला सिनेमाच्या टीमने प्रमोशनाची संपूर्ण तयारी केली होती, पण रजनीकांत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आता या सिनेमाला कर्नाटक राज्यातून विरोध होत आहे. कर्नाटकमध्ये अनेक संघटना या सिनेमाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यामुळे कर्नाटक राज्यात या सिनेमाला बॅन करण्यात आले आहे.

या वादासोबतच कायद्याच्या कचाट्यात पण हा सिनेमा अडकला आहे, या सिनेमाबद्दल रजनीकांतला एस तिरावीमच्या जवाहर नाडर या मुलाने कायदेशीर नोटीस पाठवून सिनेमाच्या प्रदर्शनाविरोधात न्यायालयात 101 कोटी रूपयांचा दावा केला आहे. हा सिनेमा माझ्या वडिलांच्या आयुष्यावर असून काही राजकीय फायद्यासाठी त्यांचे नाव खराब करण्याचे काम रजनीकांत आणि त्यांचा जावई या सिनेमाच्या माध्यमातून करत असल्याचा आरोप त्याने केला आहे. तसेच या नोटीसच्या अंतर्गत 36 तासाच्या आत रजनीकांत आणि त्यांच्या टीमने लिखित माफी मागावी अन्यथा 101 कोटी दंडाची रक्कम भरावी, असंही म्हटलंय.

'काला' सिनेमात सुपरस्टार रजनीकांत सोबत अभिनेते नाना पाटेकर आणि आणि अभिनेत्री हुमा कुरेशी अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे.

First published: June 5, 2018, 1:53 PM IST

ताज्या बातम्या