लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपानंतर रजत कपूरनं मागितली माफी

लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपानंतर रजत कपूरनं मागितली माफी

काही दिवसांपूर्वी दोन महिलांनी ट्विटरवरच रजत कपूरची तक्रार केली होती.

  • Share this:

मुंबई, 8 आॅक्टोबर : रजत कपूरवर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप लागल्यानंतर त्यानं ट्विटरवरून जाहीर माफी मागितली आहे. त्यानं म्हटलंय, ' मी माझ्या पूर्ण आयुष्यात एक चांगला माणूस म्हणून वागलोय. पण तरीही माझ्या हातून कुणी नकळत दुखावलं असेल तर मला क्षमा करा. मी हृदयापासून क्षमा मागतो. माझ्या कामापेक्षा मी चांगला माणूस असणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. यापुढे मी चांगलं असण्याचा जास्त प्रयत्न करेन.'

काही दिवसांपूर्वी दोन महिलांनी ट्विटरवरच रजत कपूरची तक्रार केली होती. त्यात एकीनं लिहिलं, रजत कपूर तिला वारंवार फोन करायचा. तिला वाटायचं रजत कपूर तिला सिनेमा शूट करायला सांगेल. त्यानं तिला तुला एखादं रिकामं घर माहीत आहे का, असंही विचारलं. त्यावरून ती सावध झाली. तिनं असंही म्हटलंय की त्याच्याकडे फोन नव्हता. म्हणून तो सौरभ शुक्लाच्या फोनवरून फोन करत होता.

दुसरी महिला पत्रकार आहे. तिनं फोनवरून मुलाखत घेताना त्यानं तिला विचारलं, तुझ्या आवाजाएवढीच तू सेक्सी आहे का? मधे मधे तो असंच काही बोलत होता.

तनुश्री दत्तानं आरोप केल्यानंतर बाॅलिवूड सेलिब्रिटींविरोधात अनेक महिला पुढे आल्यात.

२००८ मध्ये हाॅर्न ओके प्लीज या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं असा आरोप तनुश्रीने केला होता. याच सिनेमातील ज्या गाण्यावर वाद निर्माण झाला त्या गाण्याचे गणेश आचार्य हे कॉरियॉग्राफ होते. नाना आणि तनुश्रीमध्ये वाद झाल्यानंतर गणेश आचार्यने नानांची बाजू घेतली होती. त्यावरून तनुश्रीने गणेश यांना खोटारडा आणि दुटप्पी माणूस म्हणून टीका केली होती.

तनुश्रीने पोलिसांत तक्रार दाखल करण्याआधी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.अखेर आज तिने पोलिसांत तक्रार दाखल केलीये. अभिनेते नाना पाटेकर, निर्माते सामी सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग आणि कोरिओग्राफर गणेश आचार्य ह्यांच्याविरोधात अभिनेत्री तनुश्री दत्ताने ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

PHOTOS : नाना पाटेकरांंनंतर याही सेलिब्रिटींवर लागले गैरवर्तनाचे आरोप

First published: October 8, 2018, 3:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading