राजस्थानची सुमन राव झाली फेमिना मिस इंडिया 2019

राजस्थानची सुमन राव झाली फेमिना मिस इंडिया 2019

फेमिना मिस इंडिया किताब जिंकल्यानंतर आता सुमन मिस वर्ल्ड स्पर्धेत जाणार आहे. सुमन या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. सुमनशिवाय इतर स्पर्धकांची नावंही चर्चेत होती.

  • Share this:

मुंबई, 16 जून- फेमिना मिस इंडिया २०१९ चा निकाल लागला. राजस्थानच्या सुमन रावने हा किताब जिंकला. २२ वर्षीय सुमनने अनुकृती वासनंतर तिने हा किताब जिंकला. सरदार वल्लभ भाई पटेल स्टेडिअममध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत हुमा कुरेशी, चित्रंगदा सिंग, रेमो डिसूजा, विकी कौशल आणि आयुष शर्मा, मिस वर्ल्ड २०१८ वेनेसा पोंसे, शहाने पिकॉक, मुकेश छाबरा हे सेलिब्रिटी उपस्थित होते. सुमनला मिस इंडिया २०१८ च्या अनुकृती दासने ताज घातला.

सुमन सध्या चार्टड अकाउंटची तयारी करत आहे. सुमनने हा किताब जिंकून आपलं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. आपल्या या विजयानंतर सुमन म्हणाली की, तिच्यात आयुष्यात त्या सर्व गोष्टी करायचीही हिंमत आहे ज्यांना लोक अशक्य मानतात. आपल्या आई- वडिलांकडून ती खूप शिकल्याचं सुमनने यावेळी सांगितलं. मिस इंडिया २०१९ चा किताब जिंकणं हे तिच्यासाठी फार मोठी संधी आहे. विशेष म्हणजे २०१९ मधील मिस इंडियाचा किताब जिंकलेली सुमन गेल्या वर्षी हा किताब जिंकण्यात असमर्थ ठरली होती. गेल्या वर्षी ती उपविजेती ठरली होती.

हेही वाचा- बॉलिवूडच्या 'या' 5 सुपरस्टार बाबांनी आपल्या मुलांना दिले सर्वात महागडे गिफ्ट

फेमिना मिस इंडिया किताब जिंकल्यानंतर आता सुमन मिस वर्ल्ड स्पर्धेत जाणार आहे. सुमन या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. सुमनशिवाय इतर स्पर्धकांची नावंही चर्चेत होती. तेलंगनाच्या संजना विज उपविजेती ठरली. तर बिहारच्या श्रेया शंकरने मिस इंडिया यूनायटेड कॉन्टिनेंट २०१९ चा किताब जिंकला. छत्तीसगढच्या शिवानी जाधवने मिस ग्रँड इंडिया २०१९ चा किताब जिंकला.

या स्पर्धेत एकूण ३० स्पर्धक होत्या. यावेळी करण जोहर, मनीष पॉल आणि माजी मिस इंडिया मानुषी छिल्लरने हा शो होस्ट केला. गेल्यावर्षी तमिळनाडूच्या अनुकृती दासने हा ताज जिंकला होता. सुमन सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. हा किताब जिंकण्यापूर्वीपर्यंत तिने इन्स्टाग्रामच्या आयोमध्ये स्वतःची माहिती देताना २०१८ ची उपविजेती अशी माहिती लिहीली होती.

हेही वाचा- ऐश्वर्यापासून नागाचैतन्यपर्यंत, जाणून घ्या 'या' 5 सेलिब्रिटींच्या लग्नातील खर्च

5 हजारांसाठी उसतोड कामगाराचं अपहरण CCTV व्हिडिओ समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2019 09:37 AM IST

ताज्या बातम्या