• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Raj Kundra Case: तब्बल 8 तास सुरु होती शर्लिन चोप्राची चौकशी, केले अनेक खुलासे

Raj Kundra Case: तब्बल 8 तास सुरु होती शर्लिन चोप्राची चौकशी, केले अनेक खुलासे

बॉलिवूड अभिनेत्री(Bollywood Actress) शिल्पा शेट्टीचा पती (Shilpa Shetty Husband) राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी पोर्नोग्राफी केसमध्ये (Raj Kundra Pornography Case) अटक केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 7 ऑगस्ट- बॉलिवूड अभिनेत्री(Bollywood Actress) शिल्पा शेट्टीचा पती (Shilpa Shetty Husband)  राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी पोर्नोग्राफी केसमध्ये (Raj Kundra Pornography Case) अटक केली आहे. कुंद्राला अटक झाल्यानंतर या प्रकरणामध्ये अनेक गंभीर खुलासे होतं आहेत. या प्रकरणामध्ये अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सनी पुढे येत राज कुंद्राच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. यामधीलचं एक अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) होय. शर्लिन’ला नुकताच पोलिसांकडून समन्स पाठवण्यात आला होता. त्यानुसार काल तिची चौकशीसुद्धा पार पडली आहे. तब्बल 8 तास ही चौकशी सुरु होती.
  मॉडेल आणि अभिनेत्री असणाऱ्या शर्लिन चोप्राने या प्रकरणामध्ये काही खुलासे केले होते. तसेच मुंबई क्राईम ब्रँचला या प्रकरणामध्ये सर्वप्रथम जबाब नोंदवणारी व्यक्ती तिचं असल्याचंदेखील शर्लिनने म्हटलं होतं. यादरम्यान मुंबई क्राईम ब्रँचचा प्रॉपर्टी सेल डिपार्टमेंटने 160 सीआरपी अंतर्गत चौकशीसाठी समन्स पाठविला होता. त्यानुसार काळ शर्लिन चोप्राची चौकशी करण्यात आली. शुक्रावरी सकाळी 12 वाजता ही चौकशी सुरु करण्यात आली होती. रात्री 8 वाजता ही चौकशी पूर्ण झाली. 1..2 नव्हे तर तब्बल 8 तास शर्लिनची चौकशी सुरु होती. इन्स्टा बॉलिवूडने तिचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर शेयर केले आहेत. शर्लिनने म्हटलं आहे, की पोलिसांनी माझी राज कुंद्रा आणि आर्मस्प्राईम मीडियाच्या बाबतीत चौकशी केली आहे. तिच्या मते तिला पोर्न रेकेटमध्ये अडकलेल्या मुलींची मदत करयची आहे. आणि म्हणूचं पोलीसानां ती संपूर्ण सहकार्य देत आहे. (हे वाचा:Video: ‘प्रसिद्धीचा माज चढला आहे’; काजोलच्या उर्मटपणामुळे नेटकरी खवळले) तसेच शर्लिन चोप्राशिवाय अन्य 4 व्यक्तींचीसुद्धा चौकशी करण्यात आली आहे. हे 4 व्यक्ती राज कुंद्राचे कर्मचारी असल्याचं सांगण्यात येत आहे. शर्लिन चोप्राच्या या चौकशीनंतर राज कुंद्रा प्रकरणाला कोणतं नवं वळण ;लागणारा याकडे सर्वांचं ललक्ष लागून आहे. (हे वाचा:या चुकीमुळे करिअरला लागला ब्रेक’; रश्मी देसाईनं केला धक्कादायक खुलासा  ) 19 जुलै रोजी मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली होती. अश्लील चित्रफीत बनवण्याचा आणि तो इंटरनेटवर अपलोड करण्याचा आरोप त्याच्यावर लागला आहे. तसेच मुंबई पोलिसांनी राज कुंद्राविरोधात सबळ पुरावे असल्याचंदेखील म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवनवीन धक्कादायक खुलासे होतं आहेत. त्यानुळे हे प्रकरण अधिकचं गंभीर बनत चाललं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: