सलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी

सलमान खान सध्या पंजाबच्या बल्लोवाल गावात 'भारत'चं शूटिंग करतोय. या गावात वाघा बाॅर्डरचा सेट लावलाय.

News18 Lokmat | Updated On: Nov 14, 2018 05:08 PM IST

सलमान खानमुळे हैराण झालेत शेतकरी

मुंबई, 14 नोव्हेंबर : सलमान खान सध्या पंजाबच्या बल्लोवाल गावात 'भारत'चं शूटिंग करतोय. या गावात वाघा बाॅर्डरचा सेट लावलाय. यामुळे काही शेतकऱ्यांचा फायदा तर झाला. पण काही शेतकी एकदम हैराण झालेत.


शूटिंग दरम्यान 4 शेतकऱ्यांच्या जमिनी भाड्यानं घेतल्यात. ही जमीन 80 हजार एकर भावानं घेतलीय. पण तिथे प्रचंड सुरक्षा व्यवस्था आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतंय. त्यांना त्यांचं शेतीचं काम करता येत नाहीय.


भारतचं शूटिंग 17 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.  वाघा बाॅर्डरचा सेट उभारलाय. पण शेतकऱ्यांना आपण खरोखर बाॅर्डरवरच राहतोय, असं वाटतंय. हा सेट 19 एकरवर उभारलाय.

Loading...




चित्रपटाच्या चौथ्या शेड्युलचं शूट सुरू असताना सलमानच्या लूकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. आत्तापर्यंत या चित्रपटातील भूमिकांचे फोटोज व्हायरल होताना दिसत होते. मात्र आता सलमानचा शूटिंग दरम्यानचा फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात सलमान चेक्स शर्टमध्ये आपल्या फॅन्ससोबत दिसला आहे. सलमानच्या हेअर स्टाईलकडे पाहिलं तर याआधी बजरंगी भाईजान या सिनेमात त्याची अशी हेअर स्टाईल दिसून आली होती. आणि आता भारत चित्रपटात तो अशाच लूकमध्ये दिसणार आहे.


भाईजान सलमान या चित्रपटात पाच वेगवेगळ्या वयोगटातील भूमिकांमध्ये दिसणार आहे. सिनेमात 20 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतच्या भूमिकेत सलमान दिसेल. भारत हा चित्रपट कोरियन सिनेमा हिंदी रिमेक आहे. 'ऑड टू माय फादर' असं त्या चित्रपटाचं नाव आहे.


सिनेमाच्या कास्टिंगबद्दल याआधीसुद्धा माहिती देण्यात आली होती. अभिनेता जॅकी श्रॉफच्या भूमिकेचं नाव महाभारत असं आहे. सिनेमात सलमानच्या वडिलांची भूमिका जॅकी श्रॉफ करताना दिसेल. भारतची पहिली बायको स्मृतीचा रोल अभिनेत्री तब्बू साकारणार आहे. चित्रपटातील महत्त्वाची बाब म्हणजे सलमान खान या चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. भारतची मुलगी राधाची भूमिका अभिनेत्री दिशा पाटनी करणार आहे.  अभिनेत्री कतरिना कैफ  आणि सलमान खान यांचा रोमांस या सिनेमात पहायला मिळणार आहे.


Photos : दीपिकाच्या हातावर लागली रणवीरच्या नावाची मेहंदी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2018 05:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...