मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /धक्कादायक! चित्रपट निर्मात्याचे सनी देओलवर गंभीर आरोप, म्हणाले....

धक्कादायक! चित्रपट निर्मात्याचे सनी देओलवर गंभीर आरोप, म्हणाले....

sunny deol

sunny deol

बॉलिवूडचा अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सनी देओल. त्याने आपल्या जबरदस्त अॅक्शनने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेता सध्या त्याचा आगामी चित्रपट 'गदर 2' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 16 सप्टेंबर : बॉलिवूडचा अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सनी देओल. त्याने आपल्या जबरदस्त अॅक्शनने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेता सध्या त्याचा आगामी चित्रपट 'गदर 2' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशातच निर्माता सुनील दर्शनने सनी देओलवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये निर्माता सुनील दर्शन यांनी सनी देओलवर गंभीर आरोप केले आहेत. सुमारे 20 वर्षांपूर्वी एका चित्रपटासाठी सनी देओलने त्याच्याकडून मार्केट रेटपेक्षा जास्त पैसे घेतले आणि चित्रपट करण्यास नकार दिल्याचा आरोप सुनील दर्शनने केला आहे. तसेच त्यानी माझी फसवणूक केली आणि पैसेही परत केलेले नाहीत. अजय चित्रपटाच्या काळातही सनी देओलने पूर्ण सहकार्य केले नाही आणि चित्रपटाच्या क्लायमॅक्सचे शूटिंग न करता तो लंडनला गेला. बोलावूनही तो आला नाही, मग सुनील दर्शनने शूट झालेला भाग तसाच प्रदर्शित केला. सुदैवाने प्रेक्षकांना तो आवडला.

हेही वाचा -  'या' अभिनेत्याच्या प्रेमात आहे सोनाक्षी सिन्हा; वरुणने फोटो शेअर करत म्हटलं 'ब्लॉकबस्टर जोडी'

1996 मध्ये आलेल्या अजय चित्रपटानंतर सनी देओलने त्याच्या करिअरला सपोर्ट करण्याचं वचन माझ्याकडून घेतलं आणि त्याच्यासाठी एक चित्रपट बनवण्यास सांगितलं. मी एक वर्ष घालवून त्याच्यासाठी चित्रपट बनवला. मात्र त्याने नंतर तो चित्रपट करण्यासाठी नकार दिला. चित्रपटाच्या विषयावर काम करण्याची गरज असल्याचे सांगत चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याचं निर्माता सुनील दर्शन यांनी सांगितलं.

सनी देओल लवकरच 'चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट' या चित्रपटात दिसणार आहे. आर बाल्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दुल्कर सलमान आणि पूजा भट्ट देखील दिसणार आहेत. याशिवाय सनी देओल 'गदर 2' या चित्रपटातही काम करत आहे.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Sunny deol