Home /News /entertainment /

Big News: कॅन्सरशी झुंज अपयशी! बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्याचं लंडनमध्ये निधन

Big News: कॅन्सरशी झुंज अपयशी! बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्याचं लंडनमध्ये निधन

मनोरंजनसृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड निर्माता (Bollywood Producer) विजय गलानी (Vijay Galani) यांचं निधन झालं आहे.

    मुंबई,30 डिसेंबर:   मनोरंजनसृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड निर्माता  (Bollywood Producer)   विजय गलानी   (Vijay Galani)  यांचं निधन झालं आहे.गेल्या काही महिन्यांपासून ते कॅन्सरशी झुंझ देत होते. लंडनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांनी सलमान खान (Salman Khan), अक्षय कुमार  (Akshay Kumar), गोविंदा (Govinda), बॉबी देओल  (Bobby Deol)   यांसारख्या कलाकरांसोबत अनेक चित्रपट बनवले आहेत. विजय गलानी हे बॉलिवूडमधील एक यशस्वी निर्माता म्हणून ओळखले जात होते. ते मोठमोठ्या कलाकारांच्या अगदी जवळ होते. अनेक कलाकारांसोबत त्यांचं फारच छान बॉन्डिंग होतं. त्यांनी सूर्यवंशी (1992), अचानक (1998) अशा चित्रपटांची निर्मिती केली होती. तसेच त्यांनी 'अजनबी' चित्रपटाची निर्मितीसुद्धा केली होती. यामध्ये अक्षय कुमार, बॉबी देओल, करिना कपूर आणि बिपाशा बसू यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून ते लंडनमध्ये होते. बोन मॅरो ट्रान्सफॉर्मेशनसाठी ते आपल्या कुटुंबासोबत लंडनला गेले होते. त्याठिकाणी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना काही महिन्यांपूर्वीच कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सेलिब्रेटी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood News

    पुढील बातम्या