मुंबई, 13 फेब्रुवारी : ग्लोबल कपल प्रियांका चोप्रा आणि निक जोनस नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतात. या दोघांचं लग्न होऊन आता जवळपास दीड वर्ष पूर्ण झालं आहे. त्यामुळे प्रियांका गुड न्यूज कधी देणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. प्रियांकानं तिच्या मागच्या एका मुलाखतीत ती लवकरच बाळाचा विचार करणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच अनेकदा तिच्या प्रेग्नन्सीच्या चर्चाही सोशल मीडियावर पसरल्या होत्या मात्र नंतर त्या अफवा असल्याचं स्पष्ट झालं. पण आता लवकरच जोनास कुटुंबीयांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
प्रियांकाची जाऊबाई आणि जो जोनासची पत्नी सोफी टर्नर जोनास कुटुंबीयांना आनंदाची बातमी देणार आहे. सोफी आणि जो जोनासचं मागच्या वर्षी लग्न झालं होतं. रिपोटर्सनी दिलेल्या माहितीनुसार, सोफी टर्नर आणि जो जोनास आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. परदेशी मीडियाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 वर्षांची सोफी टर्नर प्रेग्नन्ट आहे. मात्र या कपलने ही आनंदाची बातमी केवळ कुटुंबातील सदस्यांना आणि मित्र परिवाराला दिली आहे.
परदेशी मीडियाच्या रिपोर्टनुसार, सोफीने ही बातमी लपवून ठेवली होती. मात्र सोफीच्या प्रेग्नंसीची बातमी कळताच कुटुंबियांना आनंद झाला आहे. आजकाल सोफी आपले आऊटफिटही प्रेग्नंसीनुसार निवडताना दिसत आहे. मात्र सोफी आणि जो च्या जवळच्या व्यक्तींनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रॅमी अवॉर्डसमध्ये सोफी आणि जो एकत्र दिसले होते. या अवॉर्ड फंक्शनमध्ये तिन्ही मिसेस जोनासही उपस्थित होत्या. या अवॉर्ड फंक्शनमध्ये डिप नेकलाईन ड्रेस घातल्याने प्रियंकाला ट्रोलही करण्यात आलं होतं.
सोफी टर्नर आणि जो जोनास 2016 पासून एकमेकाला डेट करत होते. 2017 ला या दोघांचा साखरपुडा झाला. तर मागच्या वर्षी बिलबोर्ड म्यूजिक अवॉर्डनंतर झालेल्या एका सरप्राईज सेरेमनीमध्ये सोफी आणि जो ने लग्न केलं. त्यानंतर जून 2019 मध्ये त्यांनी पॅरिसमध्ये जाऊन लग्न केलं. त्यावेळी त्यांचं संपुर्ण कुटुंब उपस्थित होतं.
जो आणि सोफीच्या अगोदर 2018 मध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचं लग्न झालं होतं. निक आणि प्रियांका दोघंही सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात.
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.