मुंबई, 09 जानेवारी: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra Jonas) सध्या हॉलिवूडमधील काही प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. मात्र अशावेळी ती यूकेमध्ये तिचा नवरा निक जोनसबरोबर अडकली आहे. याठिकाणी लॉकडाऊनची परिस्थिती आहे आणि सामान्यांना बाहेर ये-जा करण्याची परवानगी नाही आहे.
दरम्यान अलीकडेच अभिनेत्री प्रियांका चोप्रावर असे आरोप करण्यात आले आहेत की, तिने यूकेमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे (UK lockdown rules) उल्लंघन केले आहे. बुधवारी 6 जानेवारी रोजी ती एका सलूनमध्ये गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत तिची आई डॉ. मधु चोप्रा (Dr Madhu Chopra) आणि तिची डॉगी डायना देखील होती. दरम्यान या आरोपांबाबत प्रियांकाने आता स्पष्टीकरण दिले आहे.
(हे वाचा-हिला म्हणे तैमूरशी लग्न करायचंय; अभिनेत्रीची इच्छा ऐकून करीनाही झाली अवाक)
एका मीडिया अहवालानुसार, बुधवारी 6 जानेवारी रोजी प्रियांका चोप्रा (Priyanka chopra) सेलिब्रिटी स्टायलिस्ट जोश वुड यांच्या सलूनमध्ये गेली होती. यावेळी सेलिब्रिटी स्टायलिस्ट जोश वुड हे देखील उपस्थित होते. दरम्यान हिंदूस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार प्रियांका चोप्राच्या एका प्रतिनिधीने अशी माहिती दिली की तिने या सलूनला भेट देण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे दिली होती. ज्यानंतरच तिला याठिकाणी येण्याची परवानगी मिळाली होती. प्रियांका तिच्या चित्रपटातील भूमिकेसाठी आवश्यक केस रंगवण्यासाठी तिथे पोहोचल्याची माहिती मिळाली आहे. लंडनमध्ये तिच्या नव्या प्रोजेक्टचं शूटिंग सुरू आहे.
(हे वाचा-प्रेग्नंट अनीताने केला शकीराच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा VIDEO)
त्यांनी असे म्हटले की, 'प्रियंका सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पूर्ण अनुसरण करत आहे. तिच्या चित्रपटासाठी केस रंगवण्यासाठी ती त्याठिकाणी गेली होती आणि सलूनला खासगी मार्गाने प्रोडक्शनसाठी उघडले गेले. येथे उपस्थित सर्व लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती.' दरम्यान असेही सांगण्यात आले आहे की, याबाबत पोलिसांनाही कळविण्यात आले असून ते पूर्णपणे समाधानी आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nick jonas, Priyanka chopra