Home /News /entertainment /

प्रियांका-निक घेणार घटस्फोट? आई मधू चोप्राची 'ती' कमेंट होतेय VIRAL

प्रियांका-निक घेणार घटस्फोट? आई मधू चोप्राची 'ती' कमेंट होतेय VIRAL

प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पती निक जोनासचे (Nick Jonas ) आडनाव ( Remove Surname) हटवले आहे.

     मुंबई, 23 नोव्हेंबर-    प्रियांका चोप्राने  (Priyanka Chopra)  तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पती निक जोनासचे (Nick Jonas ) आडनाव ( Remove Surname) हटवले आहे. विशेष म्हणजे केवळ तिने सोशल मीडिया अकाउंटवरून तिच्या पती निक जोनासचे आडनावच नाही तर स्वतःचे आडनाव 'चोप्रा' देखील काढून टाकले आहे. तेव्हापासून प्रियांका तिचा पती अमेरिकन गायक आणि संगीतकार निक जोनास याच्यापासून घटस्फोट घेत असल्याची चर्चा सुरू झाली होती. लोकांना वाटू लागले की, प्रियांका आणि निकमध्ये  (Priyanka Nick Relation)  सर्व काही अलबेल नसून दोघे वेगळे होणार आहेत. मात्र, आता प्रियांकाने एका कमेंटद्वारे खुलासा केला आहे की, तिला घटस्फोट घ्यायचा आहे का पती सोबत राहायचे आहे ? निक जोनास याने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर त्याच्या वर्कआउटचा एक व्हिडिओ (Nick Jonas Video) शेअर केला आहे. यामध्ये निक हार्ड वर्कआउट करताना दिसत आहे. प्रियांका चोप्राने या पोस्टवर कमेंट केली आहे. या पोस्टमुळे हे दोघे घटस्फोट घेत असल्याची केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रियांकाने तिच्या कमेंटमध्ये इच्छा व्यक्त केली आहे की, 'तिला आयुष्यभर पतीसोबत राहायचं आहे आणि त्याच्या मिठीत मरायचं आहे.' प्रियांका चोप्राने तिच्या कमेंटमध्ये लिहिलयं, 'आश्चर्यकारक! मला तुझ्या कुशीत मरायचं आहे.' या कमेंटसोबत तिने प्रेम व्यक्त करणाऱ्या इमोजीही टाकल्या आहेत. प्रियांका चोप्राच्या या कमेंटवरून स्पष्ट होते तिला निकपासून वेगळे व्हायचे नाही. त्याच्यासोबत आयुष्य घालवायचे आहे. प्रियांकाच्या या कमेंटमुळे लोकांना सुद्धा बरे वाटले आहे. या कमेंटला हजारो लोकांनी लाइक केले असून या कमेंटवर आनंद व्यक्त केला आहे. अफवा पसरवू नका- प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या घटस्फोटावर प्रियांकाची आई मधु चोप्राने प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी सोशल मीडियावर मुलगी प्रियांका चोप्रा आणि निक (Priyanka Nick Divorce Rumours) यांच्या नात्यात सर्व काही अलबेल नसून हे दोघे घटस्फोट घेणार असल्याची जी अफवा पसरत आहे, त्याबद्दल आपले मत व्यक्त केले होते. त्या म्हणाल्या होत्या, 'हा सर्व मूर्खपणा आहे, अफवा पसरवू नका.' हिंदू-ख्रिश्चन रितीरिवाजानुसार झाले होते लग्न- प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा 2018 मध्ये राजस्थानमधील जोधपूर येथे शाही विवाह झाला होता. दोघांनी आधी हिंदू आणि नंतर ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्न केले. हॉलिवूड शो आणि चित्रपटांमध्ये अभिनय करण्यासाठी अमेरिकेत गेल्यावर प्रियांका निकला भेटली होती.
    First published:

    Tags: Bollywood, Entertainment, Nick jonas, Priyanka chopra

    पुढील बातम्या