सलमाननंतर बाॅलिवूडच्या 'या' मोठ्या दिग्दर्शकाला प्रियांकानं दिला धोका

नुकतीच तिनं 'भारत'कडे पाठ फिरवली आणि चर्चेत आली. प्रियांकानं आणखी एका मोठ्या दिग्दर्शकाला ऐनवेळी संकटात पाडलंय. तोही वैतागलाय.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2018 04:47 PM IST

सलमाननंतर बाॅलिवूडच्या 'या' मोठ्या दिग्दर्शकाला प्रियांकानं दिला धोका

मुंबई, 06 आॅगस्ट : बाॅलिवूड देशी गर्ल प्रियांका चोप्राला हाॅलिवूड आणि निकपुढे काहीही दिसत नाहीय. खरं तर प्रियांकाला तिची ओळख मिळाली ती बाॅलिवूडमुळे. बाॅलिवूडमुळेच तिला हाॅलिवूडच्या आॅफर्स आल्या. पण आता बाॅलिवूडच्या सिनेमांना ती नकार देत सुटलीय. नुकतीच तिनं 'भारत'कडे पाठ फिरवली आणि चर्चेत आली. प्रियांकानं आणखी एका मोठ्या दिग्दर्शकाला ऐनवेळी संकटात पाडलंय. तोही वैतागलाय.

ते आहेत संजय लीला भन्साळी. भन्साळी गँगस्टर सिनेमा बनवतायत. गंगुबाई कोठेवाली या गँगस्टरच्या आयुष्यावर हा सिनेमा आहे. सध्या पटकथेवर काम सुरू आहे. बऱ्याचदा एखाद्या कलाकाराला समोर ठेवून स्क्रीप्ट लिहिलं जातं. आणि तसंच काम सुरू होतं. पण प्रियांकानं आता संजय लीला भन्साळीलाही गुडबाय केलंय. त्यामुळे तो जाम भडकलाय.

हेही वाचा

सलमानची पसंत वारिना हुसेनचं आयुष्य आहे कसं?

PHOTOS : अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाणच्या साखरपुड्याचे फोटोज व्हायरल

ओबामांच्या पहिल्याच कलाकृतीसाठी प्रिया स्वामीनाथनला पसंती

प्रियांका चोप्रा आणखी एका हॉलिवूडपटात झळकणार आहे. क्रिस पॅटसोबत 'काऊबॉय निंजा वायकिंग' या सिनेमात प्रियांका काम करणार आहे असं हॉलिवूड रिपोर्टरच्या वृत्तानुसार स्पष्ट झालंय. ब्रेकिंग बॅड आणि गेम ऑफ थ्रोन्सच्या दिग्दर्शिका मिशेल मॅकलॅरन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. हा हॉलिवूडचा बिग बजेट सिनेमा असेल आणि 2019 च्या जूनमध्ये प्रदर्शित होईल असं बोललं जातंय.सलमान खानसोबत भारत हा सिनेमा नाकारल्यानंतर प्रियांकाने थेट हॉलिवूडचा सिनेमा स्वीकारलाय.त्यामुळे यापुढे तिचा कल हा बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडकडे असणार हे वेगळं सांगायची गरज नाही.

शिवाय निक हेही एक कारण आहेच. प्रियांका आणि निकची ओळख क्वांटिको या सिरियलच्या सेटवरच झाली. निक हा तिथे प्रियांकाला पहिल्यांदा भेटला मात्र त्यांच्यात जेमतेम मैत्री निर्माण झाली. यानंतर त्यांच्या भेटीगाठी होत गेल्या आणि मैत्री हळूहळू वाढायला लागली. या रिलेशनशीपबाबत चर्चा तेंव्हा सुरू झाली जेंव्हा मेट गाला इव्हेंट 2017 ला प्रियांका निकच्या हातात हात घालून रेड कार्पेटवर अवतरली होती.

निक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2018 04:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close