पुढच्या महिन्यात प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा साखरपुडा ?

पुढच्या महिन्यात प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा साखरपुडा ?

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास यांच्या नात्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जून : अनुष्का, सोनम, नेहा धुपिया यांच्या लग्नानंतर दीपिका पदुकोण आणि रणवीर कपूरच्या लग्नाच्या चर्चांना उधान आलं होतं. पण आता मध्येच देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास यांच्या नात्याची सगळीकडे चर्चा आहे. 'फिल्मी मॉन्की'च्या वृत्तानुसार प्रियांका आणि निक पुढच्या माहिन्यात साखरपुडा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून या दोघांचं नातं बहरलं आहे. सध्या प्रियांका निकला आपल्या आईला भेटण्यासाठी मुंबईत घेऊन आली आहे. ही पहिलीच वेळ आहे जेंव्हा निक भारतात आलाय. आणि गेल्याच शुक्रवारी प्रियांकाने एक खास डिनर डेट ऑर्गनाइज केली होती. यावेळी प्रियांकाने निकची ओळख आपली आई मधू चोप्रांना करून दिली.

आमिर खान ओशोंच्या भूमिकेत?

खरं तर प्रियांका आणि निकची ओळख क्वांटिको या सिरियलच्या सेटवरच झाली. निक हा तिथे प्रियांकाला पहिल्यांदा भेटला मात्र त्यांच्यात जेमतेम मैत्री निर्माण झाली. यानंतर त्यांच्या भेटीगाठी होत गेल्या आणि मैत्री हळूहळू वाढायला लागली. या रिलेशनशीपबाबत चर्चा तेंव्हा सुरू झाली जेंव्हा मेट गाला इव्हेंट 2017 ला प्रियांका निकच्या हातात हात घालून रेड कार्पेटवर अवतरली.

यानंतर कधी बेसबॉलची मॅच पहायला तर कधी हॉलिवूडमधल्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये डिनरला जाताना त्यांना स्पॉट करण्यात आलं. मात्र एवढ्यावरच निक आणि प्रियांकाचं नातं थांबलं नाही. निकने प्रियांकाची ओळख त्याच्या घरच्यांना करून दिली. आणि फॅमेली पिकनिकमध्येच प्रियांकाने निकच्या घरच्यांची मनं जिंकली. त्यानंतर ती निकच्या कझीनच्या लग्नासाठीही हजर राहिली.

खरं तर निक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.

त्यामुळे बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये सगळ्यांच्या मनावर राज करणारं हे नवं कपल पुढच्या महिन्यात खरचं साखरपुडा करणार का याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2018 12:34 PM IST

ताज्या बातम्या