VIDEO : प्रियांका चोप्रानं होणाऱ्या जाऊबाईंचा 'असा' साजरा केला वाढदिवस

VIDEO : प्रियांका चोप्रानं होणाऱ्या जाऊबाईंचा 'असा' साजरा केला वाढदिवस

प्रियांका चोप्रानं नुकताच आपली होणारी जाऊबाई सोफी टर्नरचा वाढदिवस साजरा केला. प्रियांकानं सोशल मीडियावर जोए जोनसला किस करतानाचा सोफीचा फोटो शेअर केलाय.

  • Share this:

मुंबई, 23 फेब्रुवारी : प्रियांका चोप्रानं नुकताच आपली होणारी जाऊबाई सोफी टर्नरचा वाढदिवस साजरा केला. प्रियांकानं सोशल मीडियावर जोए जोनसला किस करतानाचा सोफीचा फोटो शेअर केलाय. आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

21 फेब्रुवारीला सोफीच्या वाढदिवसाला प्रियांका निकबरोबर आली होती. सोफीच्या या 23व्या वाढदिवसाला सगळ्यांनी मिळून खूप धमाल केली. त्याचे व्हिडिओज समोर आलेत.

प्रियांका चोप्रानं सोफीला सोशल मीडियावर मेसेज पोस्ट केलाय. त्यात तिनं म्हटलंय, 'ही सगळी खूप छान आणि मजेशीर माणसं आहेत. हॅपी बर्थडे सोफी टर्नर. मी तुला वधूच्या वेषात पाहू इच्छिते. तू त्यात सुंदर दिसशील.' सोफी आणि जोए यांचं लग्न याच वर्षी होणारेय. ते बरीच वर्ष एकमेकांना डेट करतायत.

सोफीचा वाढदिवस अतिशय धूमधामीत साजरा झाला. व्हिडिओमध्ये सोफीबरोबर प्रियांका आणि निकही डान्स करतायत.

सोफी आणि प्रियांका एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी बनल्यात. दोघीही एकत्र फिरायला, शाॅपिंगला जात असतात. प्रियांका-निकच्या लग्नातही सोफीनं भारतीय पहराव केला होता.

First published: February 23, 2019, 9:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading