प्रियांका चोप्रा आशियातील सर्वात 'सेक्सी' स्त्री

प्रियांका चोप्रा आशियातील सर्वात 'सेक्सी' स्त्री

लंडनच्या इस्टर्न आय या साप्ताहिक वृत्तपत्राने आयोजित केलेल्या '50 सेक्सिेस्ट एशियन वुमन' या स्पर्धेमध्ये क्वांटिको क्विन प्रियांका चोप्रा पहिली आहे. प्रियांकाने तब्बल पाचव्यांदा हा किताब पटकावला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने 2016ला हा किताब पटकावला होता.

  • Share this:

07 डिसेंबर: बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपली आपल्या अभिनयाची आणि सौंदर्याची जादू करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा ब्रिटनच्या आशियातील सर्वात 'सेक्सी' महिला ठरली आहे.

लंडनच्या इस्टर्न आय या साप्ताहिक वृत्तपत्राने आयोजित केलेल्या '50 सेक्सिेस्ट एशियन वुमन' या स्पर्धेमध्ये क्वांटिको क्विन प्रियांका चोप्रा पहिली आहे. प्रियांकाने तब्बल पाचव्यांदा हा किताब पटकावला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने 2016ला हा किताब पटकावला होता.

या ऑनलाइन निवडणुकीत मतदान करणाऱ्या सर्व लोकांचे प्रियांकाने आभारही मानले आहेत. ती म्हणाली की, 'याचं श्रेय मी घेऊच शकत नाही. याचं श्रेय तुम्हालाच जातं. मी याबद्दल आभारी आहे आणि हा किताब पुढेही राखून ठेवण्याचा मी प्रयत्न करेन.'

ईस्टर्न आयचे एंटरटेनमेंट संपादक आणि या स्पर्धेचे संस्थापक असजाद नजीर यांनीही प्रियांका चोप्राची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले की, 'प्रियांका अतिशय सुंदर, हुशार, शूर आणि चांगल्या मनाची महिला आहे. '

प्रियांका चोप्रा आशियातील सर्वात 'सेक्सी' स्त्री

प्रियांका चोप्रा आशियातील सर्वात 'सेक्सी' स्त्री

या स्पर्धेत भारतातील छोट्या पडद्यावरील स्टार निया शर्मा हिने दुसरं स्थान पटकावलं आहे. दीपिका पदुकोण तिसऱ्या, आलिया भट्ट चौथ्या स्थानावर असून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान पाचव्या स्थानावर आहे. अभिनेत्री कतरिना कॅफ सातव्या स्थानी आहे आणि श्रद्धा कपूर आठव्या स्थानावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 11:28 AM IST

ताज्या बातम्या