लग्नानंतर प्रियांका-निकला हनिमूनला जायला वेळ नाही, कारण...

लग्नानंतर प्रियांका-निकला हनिमूनला जायला वेळ नाही, कारण...

प्रियांका-निकच्या लग्नाचं काऊंटडाऊन सुरू झालंय. वधू-वर आता जोधपूरला रवाना झालेत. 1 डिसेंबरला दीपवीरचं रिसेप्शन झालं की सगळ्यांचं लक्ष प्रियांका-निकच्या लग्नाकडेच लागेल.

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर : प्रियांका-निकच्या लग्नाचं काऊंटडाऊन सुरू झालंय. वधू-वर आता जोधपूरला रवाना झालेत. 1 डिसेंबरला दीपवीरचं रिसेप्शन झालं की सगळ्यांचं लक्ष प्रियांका-निकच्या लग्नाकडेच लागेल.

जोधपूरचा किल्ला या लग्नासाठी सजवला जातोय.या लग्नात अगोदर कुणी फोटोग्राफर्सनी फोटोज काढू नयेत म्हणून एक चांगली शक्कल लढवलीय. लग्नात वधू-वर हेलिकाॅप्टरनं एन्ट्री करणार आहेत. त्यासाठी प्रियांका पहिल्यांदा मुंबईहून उदयपूरला जाणार. तिथून उम्मेद भवन पॅलेसमधून हेलिकाॅप्टरनं जोधपूरला लग्नाच्या ठिकाणी उतरणार.

पण लग्नानंतर दोघांना हनिमून रद्द करावा लागला. कारण प्रियांकाचं द स्काय इज पिंक सिनेमाचं शूटिंग सुरू होणार आहे. शूटिंगमध्ये ब्रेक घेऊनच ती लग्नाला आलीय.

काही दिवसांपूर्वी ती द स्काय इज पिंक सिनेमाचं शूटिंग करत होती. शूटिंगच्या सेटवर तिच्या लग्नाचं जोरदार सेलिब्रेशन झालं.या सेलिब्रेशनसाठी निकही उपस्थित होता. सिनेमाच्या टीमनं दोघांसाठी मोठा केक आणला होता. तो कापून सगळ्यांनी एकच धमाल केली.

29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत हेलिकाॅप्टर बुक केलं आहे. 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीनं तर 3 डिसेंबरला ख्रिशन पद्धतीनं लग्न होणार आहे. लग्नाच्या तयारीसाठी मधू चोप्रा आधीच जोधपूरला गेल्यात.

हिंदू आणि ख्रिश्चन रीतिरिवाजामध्ये हे दोघे लग्न करणार आहेत. यात संगीत, लग्न आणि रिसेप्शन असे तीन कार्यक्रम असणार आहेत. या शाही जोडप्याचा विवाह मेहरानगड किल्ल्यावर होणार आहे.

मेहरानगड हा महाल या दोघांच्या विवाहासाठी सजवण्यात येणार आहे. हा महालाची किंमत जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला धक्का बसेल. तब्बल 60 हजार डॉलर म्हणजेच 43 लाख रुपयांना हा महाल बुक करण्यात आला आहे. राजा उम्मैद सिंह यांचा बनवलेला हा महाल आहे. आता हा ताज हॉटेलच्या मालकीचा आहे.

#TRPमीटर : 'स्वराज्यरक्षक संभाजी'ची लोकप्रियता वाढली पण कुणाची कमी झाली पाहा...

First published: November 29, 2018, 4:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading